tantamukt abhiyan 
सोलापूर

गावातील तंटामुक्‍त समित्यांबाबत सरकारचा निर्णय...काय तो नक्‍की वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदे, गावांमधील गुन्ह्यांमुळे पोलिसांवरील वाढलेला ताण कमी करण्याच्या उद्देशाने गावपातळीवरील तंटामुक्‍त समित्या आता पुन्हा पुनर्जिवित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भात ग्रामविकास मंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास आहे. 


तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्‍त गाव अभियानाला सुरवात केली. गावातील लहान-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी गावातच सामंजस्याने मिटत होते. गावातील एकोपा टिकवून जातीय सलोखा निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. तंटामुक्‍त गावास शासनाकडून रोख रक्‍कम अन्‌ सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यातून गावागावांमध्ये स्पर्धा वाढली आणि पोलिसांवरील ताण कमी झाला. 2014 मध्ये सरकार बदलल्यानंतर हे अभियान कागदावरच राहिले. भाजप सरकारने या योजनेला प्रोत्साहन न दिल्याने बहूतांश गावांमधून समित्या हद्दपार झाल्या तर काही गावांमध्ये नवालाच उरल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढली असून पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर तंटामुक्‍त समित्या पुनर्जिवित केल्या जाणार असून लवकरच नव्या समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 


समित्यांचे असे असणार स्वरुप 
ग्रामसभेने निवडलेला प्रतिनिधी हा तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष. तसेच सरपंच, उपसरपंच, निर्मलग्राम योजना समिती, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामशिक्षण समिती, माजी सैनिक, वकील, पदविकाधारक, डॉक्‍टर, निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी पत्रकार, महिला बचतगट, अध्यापक, शिक्षक या घटकातील प्रत्येकी एका प्रतिनिधीची या समितीवर सदस्य नियुक्ती केली जाणार आहे. या शिवाय ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्या प्रत्येकी एका सदस्यासह गावातील इतर प्रभावी अशा किमान तीन ते कमाल पाच व्यक्तींचाही समावेश केला जाणार आहे. 


ठळक बाबी... 

  • पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय 
  • गावोगावच्या सर्व समित्या नव्याने स्थापन होणार 
  • गावातील तंटे गावातच मिटण्यास होणार मोठी मदत 
  • महिला अन्‌ युवतींच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष असणार 
  • तंटामुक्‍त गावांचा होणार गौरव : रोख पारितोषिकांसह केला जाणार सन्मान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

SCROLL FOR NEXT