Mangalvedha lift Irrigation Scheme inaugurated Sharad Pawar
Mangalvedha lift Irrigation Scheme inaugurated Sharad Pawar sakal
सोलापूर

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला शरद पवारांच्या हस्ते मुहूर्त

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : गेल्या अनेक वर्षापासून राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे असून लवकरच या योजनेचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले तालुक्यातील 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नावर अनेक राजकीय खलबली खलबते झाले असून या योजनेला मुहूर्त मिळाला नाही.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत यावर देखील अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या योजनेबाबत सलगर बुद्रुक येथील सभेत सविस्तर विश्लेषण केले होते मात्र पोटनिवडणुकीच्या निकालानंतर या योजनेच्या बाबत हालचाली होत नसल्याबाबतचे वृत्त सकाळच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते व यावर राज्यातील सत्ताधारी पक्ष व केंद्रातील सत्ताधारी पक्ष यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले होते परंतु त्याबाबतची पूर्ती होत नसल्याबाबत या भागातील नागरिकातून नाराजीचा सूर होता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न लोकांसमोर येत होता मात्र स्व.आ. भालके यांनी लोकांसमोर ठेवत याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला 2014 या योजनेला मान्यता घेत काँग्रेस प्रवेश केला त्यानंतर राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये या योजनेचे पाणी व गावे कमी करून दाखल केलेला प्रस्ताव 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रुटी लागून परत आला त्यानंतर महा विकास आघाडी च्या रूपाने नवीन राज्यात सत्तेचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर स्व. आ.भालके यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी व गावे पूर्ववत ठेवण्यात यश मिळवले दरम्यान आजारपण आणि कोरोना साथीचा विळख्यात स्व.आ.भारत भालके यांचे अकाली निधन झाले त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना विधिमंडळात त्यांच्या अपूर्ण योजनेला मार्गी लावणे ही त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले होते.

पोटनिवडणुकी पूर्वी या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. या बाबतचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे. शिरनांदगी चे गुलाब थोरबोले यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला स्व. भारत भालके यांचे नाव देण्याची ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडला होता. मात्र या योजनेच्या मंजुरीबाबतच्या हालचाली थंड होत्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला पंढरपूर येथे आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रचार सभेच्या सुरुवातीलाच 35 गावांचा पाणी प्रश्न आम्ही मार्गी लावतो आश्वासन दिले होते त्यानंतर पोटनिवडणुकीत हे समाधान आवताडे यांना आमदार करा केंद्रातून निधी आणून योजना मार्गी लावतो असे आश्वासन दिले मात्र त्याने या प्रश्नावर साधा ब्रँ शब्द देखील काढला नाही त्याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना दिसून येणार असल्याचे वृत्त काल ई-सकाळच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते ट्विटरवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या बातमी ची दखल घेत पंढरपूर येथे बोलताना या योजनेचे भूमिपूजन लवकरच करणार असल्याचे संकेत दिल्यामुळे या भागातील नागरिकाचे आता या योजनेच्या मंजुरी कडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT