Pherphar 
सोलापूर

महाराजस्व अभियानातील फेरफार अदालत मोहिमेत मंगळवेढा तालुक्‍याचा पुणे विभागात प्रथम क्रमांक 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : महाराजस्व अभियानातील फेरफार अदालत मोहिमे अंतर्गत 1 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत तालुक्‍यातील सात महसूल मंडळातील 962 विविध प्रकारच्या नोंदी ऑनलाइन निर्गतीत मंगळवेढा तहसीलचा पुणे विभागात पहिला क्रमांक आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुका स्तरावर या मोहिमे अंतर्गत 1 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत खरेदी-विक्री नोंदी, आदेश नोंदी, हक्कसोड नोंदी अशा विविध एक हजार नोंदी निर्गत करण्याचे तालुक्‍याला उद्दिष्ट दिले. मरवडे, मंगळवेढा, बोराळे, हुलजंती, आंधळगाव, भोसे, मारापूर या मंडलात भीमा, माण या नद्यांसह उजनी कालवा, शिरनांदगी, डोंगरगाव, मारोळी, लवंगी, तळसंगी, पडोळकरवाडी या मध्यम प्रकल्पांमुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे अलीकडच्या काळात उसाबरोबर द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी, लिंबू या फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे विविध आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी बॅंक कर्ज प्रकरण, जमीन खरेदी- विक्री मॉरगेज या व्यवहारांच्या माध्यमातून केलेल्या नोंदी निर्गतीसाठी मंडलाधिकारी तलाठी यांच्या सहकार्याने विविध नोंदी निर्गतीचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. 

वरिष्ठ कार्यालयाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत पुणे विभागात फेरफार नोंदी निर्गत करण्यात मंगळवेढ्याचा प्रथम क्रमांक आला असला तरी दररोजच्या व्यवहारामुळे नोंदी वाढतच आहेत. त्या नोंदींची निर्गती होऊ लागल्याने सध्या 234 प्रलंबित नोंदी आहेत. फेरफार नोंदी निर्गतीसाठी निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, मंडल अधिकारी उल्हास पोळके, सोमनाथ जाधव, राजू बनसोडे, सी. एन. घाडगे, नागन्नाथ जोध यांच्यासह तलाठ्यांनी प्रयत्न केले. महाराजस्व अभियानातील फेरफार अदालत मोहिमे अंतर्गत 1 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत तालुक्‍यातील सात महसूल मंडळातील 962 विविध प्रकारच्या नोंदी प्रमाणित करून महसूल कर्मचाऱ्यांनी चांगले योगदान देत तालुक्‍याचे नाव पुणे विभागात चमकावले. 
- उदयसिंह भोसले,
उपविभागीय अधिकारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN-Aadhaar linking : 31 डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड होणार रद्द? ₹1,000 दंड द्यावा लागेल? जाणून घ्या मोठा अपडेट!

Dhule Municipal Election : भाजप-शिवसेना नेत्यांची बंद दाराआड खलबते; जागावाटपाचा पेच सुटणार की स्वबळाची तयारी सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : तमाशाच्या कार्यक्रमात तरुणाला बेदम मारहाण

तुमच्यात कट्टर वैर होतं? श्रीदेवीसोबतच्या वादावर अखेर माधुरी दीक्षितने सोडलं मौन; म्हणाली- आम्ही दोघी...

फक्त दहावी पास अन् Government Job! इस्त्रायलमध्ये नोकरीची संधी, १,६०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT