करमाळा न्यायालयाने दिली भोंदू मनोहरमामाला सात दिवसांची पोलिस कोठडी! Canva
सोलापूर

करमाळा न्यायालयाने दिली भोंदू मनोहरमामाला सात दिवसांची पोलिस कोठडी

करमाळा न्यायालयाने दिली भोंदू मनोहरमामाला सात दिवसांची पोलिस कोठडी!

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

आज (सोमवारी) करमाळा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मनोहरमामाला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव (ता. करमाळा) (Karmala) येथील मनोहर भोसले (Manoharmama) (मनोहरमामा) यास करमाळा येथील न्यायालयासमोर (Karmala Court) उभे केले असता, न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मनोहर भोसले यास सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. मनोहरमामा याच्याविरुद्ध बारामती (Baramati) व करमाळा पोलिसात गुरुवारी (ता. 9) एकाच दिवशी गुन्हा दाखल झाला होता. बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर काल (रविवारी) करमाळा पोलिसांनी भोसले यास ताब्यात घेतले.

आज (सोमवारी) करमाळा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भोसलेला करमाळा न्यायालयात आणले तेव्हा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. करमाळा पोलिस स्टेशन ते न्यायालय हे अंदाजे अर्धा किलोमीटर अंतर आहे. न्यायालय परिसर व पोलिस स्टेशन परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याला न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांच्यासमोर हजर केले होते. त्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे ऍड. सचिन लुणावत यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पावणेएक वाजण्याच्या सुमारास भोसलेला न्यायालयात आणले होते.

एका मालिकेत काम देतो असे सांगत पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप भोसलेवर आहे. या गुन्ह्यातील कपडे जप्त करणे, चिठ्ठी जप्त करणे अशा 17 कारणांचा शोध घ्यावयाचा आहे. त्याचा तपास करण्यासाठी तपास अधिकारी कोकणे यांनी 10 दिवस पोलिस कोठडी मागितली होती. ऍड. लुणावत यांनी सरकारकडून बाजू मांडली. दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. तर भोसलेच्या वकिलांकडून न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती. ऍड. हेमंत नरुटे व ऍड. विजय गायकवाड यांनी संशयित आरोपीकडून बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT