सोलापूर

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुंडण आंदोलन! मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा दिला इशारा

प्रसंगी त्यांच्या गाडया फोडू असा इशारा यावेळी मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला.

- भारत नागणे

निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल म्हणून काही कार्यकर्त्यांनी जल्लोशाची तयारी केली होती.

पंढरपूर (सोलापूर) : सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण (Maratha reservation)
कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मुंडण आंदोलन केले. राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार खासदारांना रस्त्यावरुन फिर देणार नाही. प्रसंगी त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला. (Maratha Kranti Thok Morcha agitation in Pandharpur)

मराठा समाजाला आरक्षण द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. आरक्षणा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्च्याचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांच्या नेतृत्वखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारच्या विरोधात अर्धनग्न व मुंडण आंदोलन करुन निषेध केला.

आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सकाळ पासूनच मराठा समाजातील कार्यकर्ते व आरक्षण प्रश्नांवर लढा देणारे क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पंढरपुरात दाखल झाले होते. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल म्हणून काही कार्यकर्त्यांनी जल्लोशाची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी निकाल विरोधात केल्याची माहिती मिळताच त्याच कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब मारुन आंदोलन केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तातडीने दाखल झाले. आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, स्वागत कदम, शशिकांत पाटील, धनाजी साखळकर, संदीप मुटकूळे, संतोष कवडे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार

न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. न्यायालयात मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यास राज्यसरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची एकमुखी मागणी आहे. जो पर्यंत आरक्षण दिले जात नाही तो पर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज पासून राज्यभर आंदोलन सुरु केले जाणार आहे, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला.

एकाही मंत्र्याची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सरकार व सरकारमधील सहभागी मंत्री अपयशी ठरले आहेत. आरक्षणा संदर्भात एकाही मंत्र्यांनी आता पर्यंत आवाज उठवला नाही. जे मराठा मंत्री सत्तेत आहेत. त्यांनाही कधी समाजाचा विचार केला नाही. अशा समाज विघातक मंत्र्यांना व आमदार खासदारांना देखील रस्त्यावरुन फिरु देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजाभाऊ गायकवाड व सुनील नागणे यांनी दिला आहे.

(Maratha Kranti Thok Morcha agitation in Pandharpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT