crime.jpg 
सोलापूर

मुलबाळ होत नाही म्हणून केला विवाहितेचा छळ : सांगोला पोलिसांत गुन्हा 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला(सोलापूर) : तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, तू अपशकुनी आहेस, तुला मूलबाळ होत नाही असे म्हणून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी वंदना उर्फ आरती दीपक काळेल (रा. विठलापुर, ता. आटपाडी, जि. सांगली. हल्ली रा. तिप्पेहळी, ता. सांगोला) तिचा विवाह 13 नोव्हेंबर 2015 रोजी दीपक नंदकुमार काळेल याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पती दीपक नंदकुमार काळेल याने पत्नी वंदना उर्फ आरतीला तू मला पसंत नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस, माझ्या आईवडिलांनी माझे जबरदस्तीने लग्न केले आहे, मी तुला नांदणार नाही, मला चारचाकी घ्यायला माहेरून पैसे आण असे म्हणून वारंवार शारीरिक, मानसिक त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी केली. 

4 ऑक्‍टोंबर रोजी पती दीपक काळेल याने पत्नीच्या माहेरी येऊन सासू-सासऱ्यांना तुमची मुलगी वंदना हीस मला घटस्फोट द्यायला सांगा, नाहीतर तुम्हाला बघून घेईल असे म्हणून मारहाण केली. तसेच सासरे नंदकुमार देवबा काळेल व सासू वंदना नंदकुमार काळेल यांनी सून वंदना उर्फ आरतीस तू अपशकुनी आहेस, तुझ्यामुळे माझी बायपास सर्जरी झाली आहे असे म्हणून घालून पाडून बोलत होते. सासु वंदना काळेल हीने सुनेला तुला घरातील स्वयंपाक नीट करता येत नाही, सासऱ्याची सेवा नीट करीत नाही, तुला लग्नाला बरेच दिवस झाले तरी अजून मूलबाळ होत नाही असे म्हणून मारहाण करून शिवीगाळ करून माहेरी हाकलून दिले आहे. याबाबत वंदना उर्फ आरती दीपक काळेल हिने पती दीपक काळेल, सासरा नंदकुमार काळेल, सासु वंदना काळेल सर्व (रा. विठलापूर, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय थिटे करीत आहेत.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीत मोठी घसरण! सलग पाचव्या दिवशी सोनं स्वस्त; आजचा भाव किती?

PMC Decision: पुणे महापालिकेचा निर्णय! महिलांना करात ५० टक्के सवलत, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मिळणार लाभ, काय आहेत अटी व शर्ती?

Latest Marathi News Live : शहादाच्या प्रकाशा येथे अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांवर कारवाई

Ration Scam : ठराविक रेशन दुकानदारांना जास्तीचे धान्य; कोट्यवधींचा अपहार, दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

लग्न करुनही जॅकी-रकुल 'सिच्युएशनशिप'मध्ये! अभिनेता म्हणाला...'मी बायकोपासून एक्स गर्लफ्रेंडचा...'

SCROLL FOR NEXT