bajar2.jpg 
सोलापूर

अक्कलकोटची बाजारपेठ सोमवारपासून उघडणार 

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट(सोलापूर): अक्कलकोट शहरात ठरल्याप्रमाणे सोमवार(ता.8) पासून बंद असलेली दुकाने सम व विषम तारखांनुसार सुरू करण्यात येणार आहेत. दररोज सकाळी सात ते दोन या वेळेत ही दुकाने सुरू राहतील, अशी माहिती मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली आहे. 

मात्र यात दारू दुकाने, हॉटेल, मॉल व खानावळ, पान व तंबाखू टपऱ्या, ज्यूस सेंटर, व्यायामशाळा आदी बंदच राहणार आहे. 
आता यातील काही दुकाने सोमवारी (ता. 8) सम, तर मंगळवारी (ता. 9) विषम तारखेनुसार सुरू राहणार आहेत. सोमवारी शिवाजीनगर तांडा स्टेशन रोड ते मंगरुळे बायपास चौक, ए-वन चौक, विठ्ठल मंदिर, जुना तहसील, फत्तेसिंह चौक, मेन रोड, सेंट्रल चौक, सराफ बाजार, कापड बाजार, कारंजा चौक, एखंडे घर, बसस्थानकमार्गे एमएसईबी चौक असे जाताना उजव्या बाजूला असलेली लक्ष्मी स्टील, फूड झोन, बालाजी बेकरी, ए-वन चौक गाळे, गणेश झेरॉक्‍स, भास्कर डेअरी, कापसे मेडिकल, डॉ. मेहता दवाखाना, निनाद शहा ज्वेलर्स, प्रकाश उण्णद, बालाजी कापड दुकान, घिवारे ब्रदर्स याप्रमाणे या बाजूस असणारी दुकाने सुरू राहतील. 

मंगळवारी याच रस्त्यावरील त्यांच्यासमोरच्या (विरुद्ध) बाजूस असणारी सर्व दुकाने उघडी राहणार आहेत. पुढे एकदिवसाआड यानुसार ही प्रक्रिया 15 जूनपर्यंत राहणार आहे. दर रविवारी स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. 15 तारखेनंतर ही दुकाने सकाळी सात ते पाच अशी त्याच पद्धतीने उघडली जाणार आहेत. असेच शहरभर नियोजन करण्यात आले आहे. आता व्यापारी आणि नगरपरिषद यांनी समन्वय साधत कोणत्याही दुकानासमोर दुचाकी वा तत्सम वाहने थांबणार नाहीत व अनावश्‍यक गर्दी होणार नाही. तसेच कोणताही व्यापारी नियमभंग करणार नाही याची काळजी घ्यावी. अनावश्‍यक गर्दी करण्याचा व नियमभंग करण्याचा पूर्वीचा अनुभव पाहता कोरोना काळातील नागरिकांची वाट मात्र बिकट राहणार आहे. 

दुकाने सुरू करताना घ्यावयाची काळजी 

दुकाने फक्त सम- विषमप्रमाणेच उघडतील 
प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व हॅंडग्लोव्हजचा वापर बंधनकारक 
दुकाने फक्त 7 ते 2 यावेळेतच उघडतील याची पाहणी 
सर्व दुकाने रविवारी बंद 
जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारावर भर 
कोरोना प्रतिबंध होण्यासाठीचे शासनाचे सर्व नियमांचे पालन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT