Akluj Market 
सोलापूर

बाजारपेठेची भिस्त आता लग्नसराईवरच ! दिवाळीत गतवर्षीच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्के व्यवसाय 

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : कोरोनामुळे ठप्प झालेल्या व्यवसायास दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दिवाळीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 30 ते 40 टक्केच व्यवसाय झाला आहे. येणाऱ्या लग्नसराईत तरी बाजार पुन्हा बहरेल व व्यवसाय तरेल, अशी आशा व्यापाऱ्यांना असून, आता त्यांची सर्व भिस्त लग्नसराईवरच आहे. 

दिवाळीमुळे कोरोनाच्या काळात चिखलात रुतलेला अर्थव्यवस्थेचा गाडा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा होती. परंतु, अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिके नष्ट झाली, शेती वाहून गेली. त्यामुळे शेतकरी - कष्टकऱ्यांची दिवाळीत खरेदी झाली नाही. कष्टकऱ्यांच्या हाताला अद्याप काम नाही. त्यामुळे त्यांच्या खिशात पैसा नसल्याने त्यांचीही खरेदी थांबली आहे. दरवर्षी सुमारे 15 दिवस दिवाळीची खरेदी होत असते. यंदा फक्त चारच दिवसांत ग्राहकांनी खरेदी केली. त्यातून मागील वर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्केच व्यवसाय झाला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे उद्योग-धंदे, व्यवसाय, कंपन्या, व्यापारी आस्थापने सर्व काही बंद होते. त्यामुळे सर्व व्यापारी मेटाकुटीला आले होते. ऑगस्टमध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर दुकाने सुरू करूनही वाहतुकीवर बंधने आली. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने व्यापाऱ्यांचेही कंबरडे अक्षरशः मोडले. मात्र, दिवाळीनिमित्त परिसरातील साखर कारखान्यांनी काही सरकारी, सहकारी व खासगी संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा दिला. त्यामुळे हे लोक खरेदीसाठी घराबाहेर पडले. मागील आठ महिन्यांत व्यवसाय पूर्णतः बुडाला होता. मात्र नोव्हेंबरच्या सुरवातीपासून व्यवसाय काहीसा वाढला आहे. सध्या 30 टक्के व्यवसाय पूर्ववत झाला असून यातून लॉकडाउनमध्ये झालेले नुकसान काहीसे भरून निघेल, अशी अशा व्यापाऱ्यांना आहे. 

लग्नाच्या खरेदीवरही मर्यादा 
सालाबादप्रमाणे दिवाळीनिमित्त बहीण, पत्नी अथवा आईला भेट देण्यासाठी कपडे, साडी अथवा भेटवस्तू खरेदीसाठी येणारा ग्राहक यंदा नव्हता. आता त्यातच कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्‍यतेने ग्रामीण भागातील ग्राहक अकलूजमध्ये येण्याचे टाळू लागला आहे. पुढील महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने काहींनी खरेदीला सुरवात केली आहे. मात्र, बहुतांश जणांचे बजेट कोलमडल्याने किंवा लग्नाचा मोठा लवाजामा आणि लोकांच्या सहभागावरील मर्यादांमुळे खरेदीचा खर्चही 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी केला असल्याचे सोन्यासह कापड, किराणा माल आणि इतर दुकानदारांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Herald Case Update : 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात राहुल गांधी अन् सोनिया गांधींना मोठा धक्का!

Viral Video : ''मॅडम माझ्या मुलीला मारू नका, तिला आई नाहीये'', भर वर्गात वडीलांना अश्रू अनावर; बाप-लेकीचा भावूक करणारा व्हिडीओ

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Indian History : भारत 150 वर्षांपूर्वी कसा होता? सायकलवरून जगभर प्रवास करणाऱ्या पहिल्या माणसाने आपल्या देशाबद्दल काय लिहिलंय? पाहा

BMC Election: एकनाथ शिंदेंचा मित्रपक्षाला धक्का! अजित पवार गटाची ताकद शिंदेसेनेसोबत

SCROLL FOR NEXT