Marriage 
सोलापूर

"उम्मीद'च्या अनाथ कन्येच्या जीवनात आनंदाची उमेद; पार पडला विधिपूर्वक विवाह सोहळा 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : अनाथ, एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांना जीवन जगण्यासाठी आधार असलेल्या कुर्डुवाडी येथील "उम्मीद' या संस्थेतील एका तरुणीचा पंढरपूर येथील एका तरुणाशी मंगलमय वातावरणात व विधिपूर्वक विवाह सोहळा पार पडला. "उम्मीद'मुळे उभयतांमध्ये वैवाहिक जीवनातील आनंदाची उमेद निर्माण झाली. 

"उम्मीद'च्या सचिवा डॉ. ब्रह्माकुमारी प्रमिलाबेन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह समारंभात श्री गणेश चतुर्थी अन्नछत्रचे संस्थापक - अध्यक्ष बालाजी लुक्कड व त्यांच्या पत्नी भारती लुक्कड यांनी वस्तू, वस्त्र देऊन कन्यादान केले. वयाच्या 13 व्या वर्षी सायन (मुंबई) येथून ही मुलगी उम्मीदमध्ये आली होती. सुमारे नऊ वर्षांच्या रहिवासानंतर तिचा विवाह पंढरपूर येथील तरुणाशी करण्यात आला. 

पंढरपूर येथे झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या कुर्डुवाडी शाखेचे शाखाधिकारी नीलेश कांबळे, बालाजी लुक्कड, भोसरे येथील केजीएन वस्त्र भांडार, विश्वार्पण संस्थेचे शीतल चिवटे, मिलिंद डिकोळे, अल्लीश्वर बागवान, विजया पवार आदींनी वस्तुरूपी सहकार्य केले. 

यासाठी उम्मीदचे अष्टविनायक स्वामी, गोविंद सुतार, शुभमकुमार जैन, रूपेश गोरंट्याल, नागरबाई बनसोडे, गौतम बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्यास सुरेश चव्हाण, भारत बोधले, विलास दौलतोडे, विठ्ठल बागल व उम्मीदमधील बालचमू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळून उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये ऊस कारखान्यांकडे राहिलेल्या थकीत बिलासाठी शेतकरी आक्रमक

Akhil Bharatiya Natya Parishad: रत्नागिरीत रंगभूमी दिन साजरा; ‘चौकट राजा’ नाट्याने रंगकर्म्यांना मार्गदर्शन

बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण! संतप्त शेतकऱ्यांतर्फे दगडफेक, पोलिसांकडून लाठीहल्ला

Ladki Bahin : लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीत तांत्रिक अडथळे; लाभार्थी महिलांचा संताप!

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

SCROLL FOR NEXT