सोलापूर

यू-ट्युबच्या माध्यमातून दिले मराठीतून गणिताचे धडे 

संतोष सिरसट

सोलापूर ः कोरोनाच्या पार्शभूमिवर ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. अनेक व्हिडीओ यू-ट्युबच्या माध्यमातून पाहता येतात. मात्र, ते बहुधा इंग्रजीमध्ये असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण होते. त्यावर मात करत निमगाव विद्यामंदीर निमगाव (ता. माळशिरस) येथे कार्यरत असलेल्या मोहन देशमुख या शिक्षकांनी "एम. बी. देशमुख टेंथ मॅथेमॅटिक्‍स' हा यू-ट्युब चॅनेल सुरू केला आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना होत आहे. 

ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत. ही अडचण लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी देशमुख यांनी संपर्क साधला. त्यातून नव्वद टक्के कुटुंबामध्ये इंटरनेट असलेला किमान एक स्मार्ट फोन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दिवसभर कामाच्या निमित्ताने पालक जरी घराबाहेर असले तरी सायंकाळच्या वेळी घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ते मोबाईल देत आहेत. विद्यार्थी सुद्धा त्या-त्या दिवशी शिकविलेला भाग शिकून गृहपाठ पूर्ण करून व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून शिक्षकांना पाठवत आहेत. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे निरसन फोनद्वारे आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून केले जाते. पालकांना वेळोवेळी फोनद्वारे संपर्क करून विद्यार्थ्यांची प्रगती कळवली जात असल्यामुळे देशमुख यांच्याबद्दल पालकांमध्येही समाधानाची भावना आहे. 

श्री. देशमुख यांनी 16 जुलैपासून गणित भाग एक व दोन असे दोन्हींचे एकूण 60 पेक्षा जास्त भाग चित्रित करून प्रदर्शित केले आहेत. घरी राहुनच शिकविलेल्या भागावर सराव परीक्षा देखील त्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागात मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या यू-ट्युब चॅनेलवरील तासिकांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आपल्या अभ्यासात कोणताही खंड पडू न देता शैक्षणिक नुकसान टाळण्याचे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले आहे. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार आणि मुख्याध्यापक बी. एन. जाधव यांनी कौतुक केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: रोहित १४ धावांवर आऊट झाला, पण तरी दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला; भारतात खेळताना नवा विक्रम नावावर

Kolhapur Football League : केएसए ‘ए’ डिव्हिजनमध्ये खंडोबा तालीमची धडाकेबाज कामगिरी! पिछाडीतून ४–२ विजय, बालगोपाल धुळीस मिळाला

Datta Jayanti 2025: उद्या दत्त जयंती, 'या' मंत्राचा जप केल्यास दत्तगुरूंची कायम राहील कृपादृष्टी

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास २० मिनिटांत होणार! देशातील पहिला शहरी रस्ता बोगदा वास्तवात उतरणार; मार्ग कसा असणार?

"स्त्रीला देवीचा दर्जा दिला की सगळं सोपं" महिलांवर होणाऱ्या अन्यायावर गिरीजा व्यक्त; म्हणाली..

SCROLL FOR NEXT