walse patil photo 
सोलापूर

वळसे-पाटलांचे देवदर्शन अन्‌ कार्यकर्त्यांसोबत बैठक 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या (शुक्रवारपासून) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर वळसे-पाटील यांचा पहिलाच सोलापूर दौरा होत आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता पंढरपूर येथे त्यांचे आगमन होणार असून उद्याचा मुक्काम पंढरपुरात करून शनिवारी विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेऊन ते सोलापूरकडे येणार आहेत. 
हेही वाचा - शेतकऱ्यांनी निवडले बारा बाजार समितीचे संचालक 
शनिवारी दुपारी 1 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृहात सोलापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी चार ते सहा या वेळेत शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी भवनात बैठक घेणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता वडाळा येथे ते जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत. शनिवारी सोलापुरात मुक्काम करून रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. 
हेही वाचा - सर्वसामान्यांची सरपंच होण्याची संधी हुकणार 
त्यानंतर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन सकाळी 11 वाजता शिवभोजन योजनेचे उद्‌घाटन ते करणार आहेत. दुपारी बारा वाजता शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. दुपारी दोन वाजता सातरस्ता येथील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर घरकुल निर्माण समितीची बैठक घेणार आहेत. सहा वाजता मोटारीने अक्कलकोटकडे रवाना होणार आहेत. अक्कलकोटवरून सोलापूरला येऊन सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसने ते मुंबईला रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT