Ujani Pipeline 
सोलापूर

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी : सर्वेक्षण, मूल्यांकन अहवाल वर्षाखेरपर्यंत शासनाकडे ! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीच्या कामाबाबत गुरुवारी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी महापालिकेत संबंधित विभागांची बैठक घेतली. या वेळी सर्वेक्षण व मूल्यांकन अहवाल 31 डिसेंबरपर्यंत शासनाकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापालिकेच्या वतीने 9 सप्टेंबर 2020 रोजी सोलापूर ते उजनी दुहेरी पाइपलाइन प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने गुरुवारी महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये सोलापूर ते उजनी दुहेरी पाइपलाइनच्या भूसंपादनाचे काम व शेती पिकाचे नुकसान यासंदर्भात आयुक्त शिवशंकर यांनी बैठक घेतली. या बैठकीस आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, कार्यकारी अभियंता सी. भांडेकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता वी. कोळी, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता आर. एम. जेऊरकर, भूमी अभिलेख अधिकारी, माढा पी. सी. कांबळे, भूमी अभिलेख अधिकारी, मोहोळच्या सुजाता माळी, उत्तर सोलापूरचे भूमी अभिलेख अधिकारी एम. एस. काडगावकर, ए. के. माशाळे, एजाज शेख आदी उपस्थित होते. 

स्मार्ट सिटीच्या कामाचाही आढावा 
या बैठकीमध्ये सोलापूर ते उजनी पाइपलाइनचे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या व 28 डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण आणि मूल्यांकन पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत शासनास सादर करण्याचे ठरले. तसेच स्मार्ट सिटीकडून पूर्ण झालेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबत आढावा घेण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्दैवी घटना! गोरेगावमधील भगतसिंग नगरमध्ये भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Budget 2026 : करदात्यांसाठी खुशखबर! येणाऱ्या बजेटमध्ये ‘या’ ५ गोष्टींमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; तुम्हाला नेमका काय फायदा?

World GK : भविष्य सांगणारा आरसा ते मेलेल्या लोकांशी बोलण्यापर्यंत..! 'या' 7 गॅझेट्सनी जगाला हादरवलंय

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज अजित पवारांचा रोड शो

Police Moustache: पोलीस दलात मिशी ठेवली तर मिळतो भत्ता! आजही ब्रिटिश कालीन जुनी परंपरा कायम, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT