mim and bjp 
सोलापूर

'एमआयएम'ची भाजपला साथ ! पराभवाला जबाबदार धरत महाविकास आघाडीला दिला झटका; भाजपची रणनिती यशस्वी

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचा संकल्प करीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीने वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएमला सोबत घेतले. त्याचवेळी शिवसेनेतील नाराज असलेल्या दोन सदस्यांच्या समित्या एमआयएमला देण्यात आल्या. सभापती निवडीत 'एमआयएम'च्या दोन्ही समित्या पराभूत झाल्यानंतर एमआयएमने या पराभवाचा वचपा काढीत शिवसेनेला हवी असलेली महिला व बालकल्याण समिती पाडल्याचे पहायला मिळाले. तर एमआयएम तथस्थ राहिल्याने शिवसेनेला चिठ्ठीद्वारे एकमेव कामगार व समाजकल्याण ही समिती मिळाली.

'हंचाटे' यांच्यामुळेच चार महिला सभापती 
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेविरुध्द बंडखोरी केल्याने राजकुमार हंचाटे यांनी महेश कोठे यांच्या विरोधात प्रचार केला. तो राग मनात धरून आपल्याला पक्षात किंमत दिली जात नव्हती. अमोल शिंदे यांना विरोधी पक्षनेते करावे, अशी ग्वाही देऊनही कोठे यांनी ती पूर्ण केली नाही. पक्षहितापेक्षा सोयीचे राजकारण करणाऱ्या कोठे यांना पक्षातील दोघांना संधी देण्यासंदर्भात सांगितले, तरीही त्यांनी कोणाचेच ऐकले नाही, असा आरोप हंचाटे यांनी केला आहे. त्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले. महिला व बालकल्याण समितीत पुरुष नगरसेवकाला घेण्याची काहीच गरज नसतानाही त्यांनी संधी दिल्याने पक्षातील काही नगरसेवक नाराज असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपतर्फे मेनका राठोड, अनिता मगर, देवी झाडबुके व कल्पना कारभारी या चार महिलांना सभापतीपदाची संधी दिली.

विषय समित्यांच्या निवडीपूर्वी 'एमआयएम'ला महिला व बालकल्याण समिती देण्याचे ठरले होते. त्यानुसार राजकुमार हंचाटे यांनी भारतसिंग बडूरवाले आणि अनिता मगर यांना दोन्ही समित्यांवर सभापती करा, अशी मागणी पक्षातील पदाधिकारी व महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याकडे केली. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत कोठे हे दोन समित्यांऐवजी महिला व बालकल्याण समितीच्या मागणीवर ठाम राहिले. या रागातून हंचाटे यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला आणि त्यांनी अनिता मगर यांनाही सोबत घेतले. मगर या शिवसेनेच्या असतानाही त्यांनी भाजपपुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने डाव यशस्वी करीत चार समित्या मिळविल्या. या निवडीत वंचित बहूजन आघाडी, कॉंग्रेस आणि शिवसेनेला एक समिती मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनिता रोटे यांनी विषय समित्यातून माघार घेतल्यानंत शिवसेनेकडून उमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, हंचाटे आणि मगर यांच्याविरुध्द पक्षाविरोधी काम केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवानंद पाटील, अनंत जाधव यांच्यासह आदींनी महत्वाची भूमिका बजावली.

भाजपने घेतली 'एमआयएम'ची मदत 
महिला व बालकल्याण समिती देण्याची ग्वाही देऊनही विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलली. त्यांनी ही समिती स्वत:साठी मागितली आणि त्यांच्या पक्षातील दोन सदस्य बंडखोरी करतील, याचा अंदाज असतानाही त्यांनी त्या समित्या 'एमआयएम'ला दिल्याची चर्चा आहे. सुरवातीला स्थापत्य समितीवर कॉंग्रेसने विजय मिळविल्यानंतर दुसरी समिती शहर सुधारणा आणि वैद्यकीय समित्यांसाठी मतदान झाले. या दोन्ही समित्यांमधील शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी बंडखोरी करीत भाजपला साथ दिली. त्यामुळे एमआयएमचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. त्याचवेळी महिला व बालकल्याण समितीसाठी इच्छूक असलेल्या एमआयएमच्या नगरसेविका तस्लिम शेख या नाराज झाल्या. त्यानंतर त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या निवडीवेळी भाजपच्या कल्पना कारभारी यांना साथ दिली. त्यामुळे ही समिती मिळविण्यात भाजप यशस्वी ठरला. निवडणुकीनंतर दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती न करणाऱ्या शिवसेनेने माहिती असतानाही पराभूत होणाऱ्या दोन्ही समित्या आम्हाला दिल्या. त्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचे तस्लिम शेख यांनी स्पष्ट केले.


चिठ्ठीद्वारे शिवसेनेला मिळाली एक समिती
राष्ट्रवादीला देऊ केलेली कामगार व समाजकल्याण समिती त्यांनी नाकारली. दरम्यान, त्याठिकाणी उमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, दोन्ही समित्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर एमआयएमने तटस्थेची भूमिका बजावली. त्यामुळे या समितीसाठी चिठ्ठीद्वारे सभापती निवड झाली. त्यात उमेश गायकवाड यांची लॉटरी लागली. चिठ्ठीद्वारे शिवसेनेला एकमेव समिती मिळाली, अन्यथा शिवसेनेला एकही समिती मिळू शकली नसती, अशी चर्चा होती. दुसरीकडे विधी समितीतील शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती खटके यांनी अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे कॉंग्रेसला एक समिती गमवावी लागली. तर एमआयएमच्या नगरसेविका वाहिदा भंडाले आणि अझहर हुंडेकरी हेही गैरहजर राहिल्याचे पहायला मिळाल्याचाही फटका महाविकास आघाडीला बसला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT