2Vaccination_0.jpg
2Vaccination_0.jpg 
सोलापूर

'मिशन- 10 के' ! जिल्ह्यातील 53 केंद्रांवर 'या' दहा हजारजणांना टोचली जाणार शुक्रवारी लस

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील 18 हजार 122 जणांना कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली आहे. आता लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात आली असून शुक्रवारी (ता. 12) 53 केंद्रांवर एकाच दिवशी दहा हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे.

'या' केंद्रांवर होणार लसीकरण 
अक्कलकोट (शिरवळ) प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, बंदिछोडे हॉस्पिटल, बार्शी, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, एनयुएचएम, बार्शी, बकरे हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पांगरी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर, ग्रामीण रुग्णालय माढा, ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र मोडनिंब, प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभूर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र कामती, गोळवलकर हॉस्पिटल, झाडबुके हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय मोहोळ, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, अश्‍विनी हॉस्पिटल नातेपूते, ग्रामीण रुग्णालय माळशिरस, राणे हॉस्पिटल अकलूज, श्रेयस हॉस्पिटल श्रीपूर, प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, महिला हॉस्पिटल मंगळवेढा, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर, ऍपेक्‍स हॉस्पिटल पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय करकंब, विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर, गादेगाव, कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगोला ग्रामीण रुग्णालय, दक्षता हॉस्पिटल, बाबर हॉस्पिटल सांगोला, मजरेवाडी नागरी आरोग्य केंद्र, सोरेगाव, रामवाडी, देगाव, जोडभावी पेठ, विडीघरकूल, मुद्रा सनसिटी, भावनाऋषी, मदरटेरेसाटेरेसा पॉलरक्‍लीनीक, एसआरपी कॅम्प, पोलीस हेडक्वॉटर, सिध्देश्‍वर हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, धनराज गिरजी हॉस्पिटल, मंद्रूप ग्रामीण रूग्णालय, अश्‍विनी ग्रामीण रूग्णालय कुभांरी, कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र.

कोरोनाचा विषाणू हद्दपार करण्याच्या हेतूने आता लसीकरणाचा वेग वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आदी उपस्थित होते. बैठकीतमध्ये लसीकरणासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यात लस न घेतलेले शासकीय व खाजगी डॉक्‍टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर (पोलिस, महसूल, पंचायत समितीकडील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महापालिका कर्मचारी, नगरपरिषदेकडील कर्मचारी) यांना लस टोचली जाणार आहे. अजूनही 36 हजार 636 जणांचे लसीकरण होणे बाकी आहे. त्यातील पहिला टप्पा शुक्रवारी सुरु होणार आहे. अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच मोहीम आहे. यासाठी आवश्‍यक कोविड- 19 लस जिल्ह्यास प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुध्द पिपंळे यांनी दिली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून, पडताळणी करुन देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT