यात्रा काळात पंढरपूर शहरात भाविकांची गर्दी वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर शहरासह परिसरातील 9 गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली आहे.
पंढरपूर (सोलापूर) : यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा 20 जुलै रोजी साजरा होणार असला तरी कोरोना संसर्गाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रतिकात्मक पद्धतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आषाढीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. यात्रा काळात पंढरपूर शहरात भाविकांची गर्दी वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर शहरासह परिसरातील 9 गावांमध्ये संचारबंदी (Curfew) जाहीर केली आहे. वारी काळातील संचारबंदीचा कालावधी जास्त असून तो कमी करावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) व समाधान आवताडे (MLA Samadhan Awtade) यांनी केली आहे. (MLA Paricharak and Avtade demanded to reduce the curfew in Pandharpur)
यासंदर्भात आमदार परिचारक व आवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना लेखी पत्र दिले आहे. संचारबंदीच्या कालावधीबाबत उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे येथील व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. कोरोनाची दुसरी लाट संपत आली असली तरी संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी केली आहे. यात्रा काळात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच वारी संदर्भातील नियमावली तयार केली आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसारच दहा मानाच्या पालख्यांतील 400 वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून 17 ते 25 जुलैपर्यंत नऊ दिवसांचा संचारबंदीचा आदेश जाहीर केला आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने बंद ठेवली जाणार आहेत. पंढरपूरकडे येणारी एसटीची सेवा देखील बंद ठेवली जाणार आहे. दरम्यान, नऊ दिवसांच्या संचारबंदी आदेशाबाबत पंढरपूर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांची ही मागणी विचारात घेऊन विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शहर व परिसरातील नऊ गावांमध्ये फक्त 19 ते 21 जुलैपर्यंत तीन दिवसांची संचारबंदी लागू करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक निर्यण घेणार, की आहे तोच निर्णय कायम ठेवणार, याकडे येथील व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.