सोलापूर

'मागच्या दाराने पाणी नेण्याचा या सरकारकडून प्रयत्न होण्याची शक्यता !'

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आमदार श्री.परिचारक म्हणाले, मूळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पाणी पळवून नेणारा अन्यायकारक आदेश काढायला नको होता.

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे हक्काचे पाणी पळवून नेण्याचा घाट महाविकास (Mahavikas Aghadi) सरकारने घातला आहे. आम्ही भाजप (BJP) व मित्रपक्षांचे आमदार (MLA), खासदारांनी (MP) तसेच अनेक संघटनांनी तीव्र विरोध केल्यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी सर्व्हेक्षणाचा आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जाहीर केले आहे. परंतु या सरकारवर आमचा विश्वास नाही, अजूनही मागच्या दाराने पाणी नेण्याचा या सरकारकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे, तसे झाले तर आम्ही सर्व एकत्र येऊन रस्त्यावर उतरुन तीव्र विरोध करु, असा इशारा आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी दिला आहे. (MLA Prashant Paricharak said there was a possibility of an attempt by the government to carry water through the back door)

आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एखाद्या मंत्र्याला रद्द करता येत नाही. बजेटमध्ये पहिल्यांदा तरतूद करून नंतर 22 एप्रिलला सर्व्हेक्षणाचा आदेश देण्यात आला होता. आम्ही सर्वानी तीव्र विरोध केल्यानंतर आदेश रद्द करण्याची सूचना दिली असल्याचे सांगितले गेले आहे. सर्व्हेक्षणाचे आदेश रद्द केले तरी पाणी उचलण्याचा निर्णय अजून रद्द करण्यात आलेला नाही. हा अन्यायकारक निर्णय रद्द होत नाही तो पर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

आमदार श्री.परिचारक म्हणाले, मूळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पाणी पळवून नेणारा अन्यायकारक आदेश काढायला नको होता. आधी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आणि नंतर सर्व्हेक्षणाचा आदेश या सरकारने काढला. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. पुण्यातून येणारे सांडपाणी त्यांनी पुण्याजवळच अडवावे. तिथे मोठा बॅरेज बांधावा आणि ते पाणी इंदापूर, बारामती, दौंड या सर्व तालुक्यांना द्यावे. तसे झाले तर उजनीतील पाणी ही स्वच्छ राहील, असे श्री. परिचारक यांनी नमूद केले.

उजनीतील हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत असल्यामुळे त्याला विरोध दर्शवण्यासाठी भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार 21 तारखेला पंढरपूर येथील संत नामदेव पायरीजवळ उपोषण करणार होते. त्याविषयी आज निर्णय होणार आहे. (MLA Prashant Paricharak said there was a possibility of an attempt by the government to carry water through the back door)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT