Ram Satpute 
सोलापूर

नागरिकांनो, कोरोनाला न घाबरता या तपासणीसाठी पुढे : आमदार राम सातपुते 

मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍याला कोरोनामुक्त करण्यासाठी आपणच आपले रक्षक बनावे. यासाठी घराबाहेर कामाव्यतिरिक्त न पडता, स्वच्छता राखत, ताजा आहार, पुरेशी झोप व मास्कचा वापर केल्यास कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, असे माळशिरस तालुक्‍याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले. 

द्वारकाधीश सेवाभावी संस्था, आनंदनगर आणि ग्रामपंचायत, आनंदनगर यांच्या वतीने "मदत नव्हे कर्तव्य' या भावनेतून आनंदनगर, अकलूज परिसरातील 350 नागरिकांची रक्त व कोरोनाची स्वॅब तपासणी, अँटिजेन, आरटी पीसीआर तपासणी शिबिर घेण्यात आले. त्या वेळी आमदार सातपुते बोलत होते. 

आमदार सातपुते यांच्या हस्ते समाजसेवक कै. निवृत्तीराव गायकवाड यांच्या प्रतिमेच्या पूजनाने शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी, सामाजिक बांधिलकी जपत मदत नव्हे, कर्तव्य या भावनेतून कोरोना या आजारापासून जनतेला दिलासा मिळावा म्हणून कोरोनाच्या काळातील तिसऱ्या शिबिराचे आयोजन आनंदनगर परिसरातील नागरिकांसाठी केल्याचे सांगितले. 

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्हा कार्यवाहक सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पै. आबासाहेब वाघमारे-पाटील, माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकल्प जाधव, डॉ. प्रियांका शिंदे, आनंदनगरच्या सरपंच मेघना इनामके, उपसरपंच वसंतराव गायकवाड, सदस्य राजेंद्र सोनवणे, सतीश कुंभार, विकास गायकवाड, ग्रामसेविका श्रीमती भोसले आदी उपस्थित होते. 

या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. अक्षय वाईकर यांनी, कोरोनाला न घाबरता त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे, असे सांगून सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर ठेवण्याचा सल्ला दिला. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, चव व वास न येणे ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असून ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

शिबिरामध्ये ईसीजी, शरीरातील रक्ताचे प्रमाण, किडनी, यकृताचे विकार, एचआयव्ही तपासणी करून मास्क वाटप करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT