सोलापूर

चौकशी अहवालात नाव असलेले आमदार सुभाष देशमुख म्हणाले....... 

विजयकुमार सोनवणे



सोलापूर : माजी सहकारमंत्री व आमदार सुभाष देशमुख व अन्य नऊ जणांनी 2000 मध्ये होटगी रोडवर 50 लाख रुपयांमध्ये दोन एकरचा भूखंड विकत घेतला होता.

विकास आराखड्यानुसार या जागेवर आरक्षण होते. 2001 मध्ये महापालिकेने जागेवर आरक्षण असल्याचे सांगत देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामाला परवानगी नाकारली होती. यानंतर 2004 मध्ये देशमुख यांनी महापालिकेत प्रतिज्ञापत्र दिले होते. यानुसार महापालिकेने सशर्त परवानगी दिली होती. जुलै 2012 मध्ये या जागेवर एक मजली बांधकाम झाले. नोव्हेंबर 2011 मध्ये अग्निशमन दलाने संबंधित जागेवर फायर स्टेशनची आवश्‍यकता असल्याचा दावा केला आहे. 

भाजपचे माजी मंत्री प्रकाश महेता, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख यांच्या विरोधातील आरोपांच्या चौकशीचे अहवाल सभागृहात मांडण्यात येणार असल्याबाबत ची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्या संदर्भात विचारले असता, श्री. देशमुख यांनी, विधी मंडळ अधिवेशनात सभागृहात मांडण्यात येणाऱ्या अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर निश्‍चित कारवाई करावी, असे मत व्यक्त केले. सोलापूर फेस्टसंदर्भात आज गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते. 

माजी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पप्रकरणी विकसकाला लाभदायी ठरेल असा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. त्याची ऑक्‍टोबर मध्ये लोकायुक्तांची चौकशी पूर्ण झाली. मात्र, अहवाल बाहेर आलेला नाही. भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीच्या आरोपाप्रकरणी खडसे यांच्याविरोधात निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग यांच्या आयोगाने चौकशी केली. त्याचबरोबर या प्रकरणाची समांतर चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही केली आहे. 

निश्‍चित कारवाई झाली पाहिजे
विधीमंडळात सभागृहात सादर होणाऱ्या अहवालानुसार शासनाने संबंधितांची चौकशी करावी. जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई झाली पाहिजे. 
- सुभाष देशमुख, आमदार 
महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

HSC Exam Form : बारावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

SCROLL FOR NEXT