palakmantri firta davakhana.jpg 
सोलापूर

फिरता ओपीडी दवाखाना सामान्यांसाठी लाभदायक : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

प्रमोद बोडके

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांवर सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच आणि शासकीय दवाखान्याबरोबर इतर खासगी दवाखान्यात उपचार होत आहेत. सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. मेट्रो एजन्सीच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या फिरत्या ओपीडी दवाखान्याचा सामान्य रूग्णांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. 

होटगी रोड एमआयडीसी येथे सलीम शेख यांच्या मेट्रो एजन्सीतर्फे कोरोना रूग्णांसाठी फिरता ओपीडी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यास श्री. भरणे यांनी भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र कोठे, माजी महापौर आरिफ शेख, यु. एन. बेरिया उपस्थित होते. 

श्री. भरणे म्हणाले, मेट्रो एजन्सीसारख्या अन्य सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शासनाला मदत केली तर कोरोनाला आपण नक्कीच हरवू. शेख यांचे कार्य कौतुकास्पद असून या पद्धतीचे दवाखाने सर्व ठिकाणी झाल्यास कोरोना रूग्ण कमी होण्यास मदत होणार आहे. खेडेगावातील रूग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा फिरता दवाखाना योग्य पर्याय आहे. आपल्या स्वत:च्या काळजीबरोबर कुटुंबातील सदस्यांचीही काळजी घ्यावी. श्री. भरणे यांनी फिरत्या ओपीडी दवाखान्याची पाहणी करून माहिती घेतली. आणखी यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

असा आहे फिरता दवाखाना 
मेट्रो एजन्सीने हा दुसरा तयार केलेला फिरता दवाखाना आहे. पहिला दवाखाना दूध गल्ली (बीएसएनएल ऑफिसजवळ) बसविण्यात आला आहे तर दुसरा बाळीवेस येथे बसविण्यात येणार आहे. सध्या हा दवाखाना दोन बेड, एसी, शौचालयासहित उपलब्ध आहे. हा दवाखाना कोविड सेल म्हणून कार्य करणार आहे. कोरोना रूग्णांना या सेलमध्ये क्वारंटाईन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये 10 बेडचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्‍टर किंवा वैद्यकीय स्टाफसाठी केबीन असणार आहे. या दवाखान्याचे ऑफिसमध्येही रूपांतर करणे शक्‍य आहे.  

 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT