accident sakal
सोलापूर

मोहोळ : कारची दुचाकीला धडक; पत्नीसमोरच जखमी पतीने सोडले प्राण

काही वेळेसाठी दुचाकीवरून खाली उतरून पायी चालत निघालेल्या पत्नीचे प्राण मात्र वाचले आहेत.

अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर (Solapur-Mangalvedha Highway) कारने एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाल्याची घटना इंचगाव (ता.मोहोळ) येथे शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याचे सुमारास घडली. सिद्राम धोंडिबा गुरव (वय 55, रा.मिरी, ता. मोहोळ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही वेळेसाठी दुचाकीवरून खाली उतरून पायी चालत निघालेल्या पत्नीचे प्राण मात्र वाचले आहेत. परंतु पत्नी समोरच पतीने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरी येथील सिद्राम गुरव हे पत्नी व मुलासह राहतात. उपजीविकेसाठी गावातच वडापाव व भजी विक्रीचा व्यवसाय करतात. आज सकाळी ते पत्नीसह गावाकडून (एम.एच.13/डी. इ. 9053) लुना या दुचाकीवरून सय्यदवरवडे व अन्य एका गावी देवदर्शनासाठी म्हणून निघाले होते.

दरम्यान, महामार्गावरील इंचगाव येथील नवीन (उड्डाण) पुलाजवळ काही कारणास्तव पत्नी गाडीवरून खाली उतरल्या होती. याच वेळी मंगळवेढ्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या इनिव्हा (क्रमांक एम.एच.45/ए. 7788) कारगाडीने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. गुरव हे दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. डोक्‍याला जोरदार मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. हा हृदयद्रावक अपघात त्यांच्या पत्नीसमोरच घडला.

या घटनेची गणेश सिद्राम गुरव (वय26 रा. मिरी) याने कामती पोलिसांत फिर्याद दिली असून कारचालक विक्रम आनंदा खांडेकर (वय 25 रा. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन जाधवर हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेडमध्ये संभाजी बिग्रेड आक्रमक

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT