Leopard 
सोलापूर

सावधान..! मोहोळमध्ये बिबट्याची सुरू झाली दहशत; पाडला शिंगरूचा फडशा

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील मलिकपेठ, खरखटणे हद्दीच्या शिवारात बिबट्याने शिंगरूवर (घोड्याच्या लहान पिलावर) करून फडशा पाडल्याची घटना शनिवारी (ता. 15) रात्री घडली. त्यामुळे मोहोळ परिसरासह आष्टे, कोळेगाव, मलिकपेठ, खरखटणे येथील नागरिकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की मोहोळ येथे सोलापूर - मोहोळ महामार्गाजवळ अवघ्या शंभर मीटर अंतरावरील सीताराम गुरव यांच्या शेतात पाण्याच्या हौदावर गुरुवारी (ता 13) रोजी रात्री नऊ वाजता बिबट्या आढळून आला होता. तर शुक्रवारी (ता. 14) रेल्वे स्टेशन परिसरातील शेतकरी लक्ष्मण यशवंतराव पाटील यांच्या शेतातील विजेच्या पेटीजवळच बिबट्या ठाण मांडून बसल्याचे प्रत्यक्ष दृश्‍य लक्ष्मण पाटील यांनी पाहिले होते. त्यानंतर रविवारी (ता. 16) मलिकपेठ व खरखटणेजवळील दाइंगडे वाडीच्या बाबा काळे यांनी सांभाळलेल्या घोड्याच्या शिंगरूवरच हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने नागरिकांमध्ये संताप 
प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन सरपंच विनोद पाटील यांनी घेतलेले बिबट्याच्या पायाचे ठसे हे मोहोळमध्ये सीताराम गुरव यांच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्याच्या पायाच्या ठशांशी मिळतेजुळते आहेत. मोहोळ, स्टेशन मार्गे कोळेगाव, आष्टे, मलिकपेठ, खरखटणे हा संपूर्ण परिसर सीना नदीकाठी असून संपूर्ण क्षेत्र उसाचे आहे. तर काही भाग ओढ्याचा असल्यामुळे दाट अशा काट्या - कुट्यांनी गर्द झाडांनी हा भाग पूर्ण व्यापला आहे. परिणामी बिबट्याला लपण्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असल्यामुळे त्याचा बिनधास्त वावर या परिसरात सुरू झाला आहे. वनरक्षक डी. डी. कांबळे, वाहनचालक वाघमोडे हे शासकीय वाहनामधून पेट्रोलिंग करीत लोकांना सावध राहण्याच्या व खबरदारी घेण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र अद्यापपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींबरोबर साधा संवादसुद्धा न साधल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT