Mohol Fire 
सोलापूर

मोहोळ नगरपरिषदेचा बेफिकीर कारभार ! अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : शुक्रवारी मोहोळ शहरातील शॉपिंग सेंटरला अचानक आग लागून झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मोहोळ नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या बेफिकीर कारभारामुळे शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती अशी, की मोहोळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला. कोट्यवधींचा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाला, मात्र जनतेला लागणाऱ्या दररोजच्या सोयीसुविधा पुरविण्यात नगरपरिषद प्रशासन कुचकामी ठरले आहे. शुक्रवारी (ता. 2) शहरातील शॉपिंग सेंटरला आग लागून त्यात सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांचे नुकसान झाले ते गरीब व्यापारी आहेत. आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही दोन- तीन घटना अशा घडल्या आहेत. 

चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ शहराला अशा दुर्घटनेवेळी तालुक्‍यातील भीमा, लोकनेते, जकराया, लोकमंगल, तसेच पंढरपूर व बार्शी या ठिकाणच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. साखर कारखाने तसेच ही शहरेही मोहोळपासून लांब अंतरावर असल्याने दुर्घटनेच्या वेळी त्यांना कळविल्यानंतर ती यंत्रणा येईपर्यंत सर्व जळून राख होते, हा मोहोळवासीयांचा नेहमीचाच अनुभव आहे. मोठा राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेल्याने तसेच उन्हाळ्याच्या तीव्रतेने चालती चारचाकी वाहने पेटण्याचेही प्रमाण मोठे आहे. 

मोहोळ शहरात नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली 17 प्रभाग येतात. या प्रभागांच्या एकाही नगरसेवकाने याबाबत कधी पाठपुरावा केला असल्याचे दिसत नाही. केवळ शहराच्या विकासाचे व्हिजन पुढे करून विविध विकासकामे घेणे व त्या माध्यमातून स्व-विकास साधणे हा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. शहराच्या सुरक्षेसाठीच्या कोणत्याही गंभीर समस्येकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे या घटनेच्या माध्यमातून अधोरेखित होते. 

नगरपरिषदेने अग्निशमन गाडीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र आचारसंहितेमुळे तो लाल फितीत अडकला आहे. आचारसंहिता शिथील होताच ते काम मार्गी लागेल. 
- रमेश बारसकर, 
प्रथम नगराध्यक्ष, मोहोळ 

नगरपरिषदेने यापूर्वीच्या जळिताच्या घटना पाहता अग्निशमन यंत्रणेसाठी प्राधान्य देणे गरजेचे होते. व्यापाऱ्यांनीही दुकानात पीओपी करताना काळजी घ्यावी, कारण वायरी मोकळ्या असल्याने उंदरांनी वायर कुरतडल्याने अशा घटना घडतात. 
- अनिल कोरे, 
कापड व्यापारी, मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेची हवा! ११ पैकी ५ नगरपालिकांवर भगवा; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला मोठा धक्का

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Shubman Gill साठी गौतम गंभीर, अजित आगरकर आग्रही होता, पण 'ते' दोघं नको म्हणाले अन् T20 World Cup संघातून पत्ता कट झाला

SCROLL FOR NEXT