Mohol  sakal
सोलापूर

Mohol : माहिती मिळत नसल्याने मोहोळ नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मंगेश पांढरे यांचे अर्धनग्न आंदोलन

विधानसभा कार्याध्यक्ष मंगेश पांढरे यांचे मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू आहे

राजकुमार शहा

Mohol - मोहोळ नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले आहेत, ते रस्ते कोणत्या निधीतून केले आहेत, तसेच ते रस्ते नगरपरिषद प्रशासनाकडे वर्ग केले आहेत काय? या मागणी साठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष मंगेश पांढरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालना समोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.

मोहोळ नगर परिषदेने मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्यास सुमारे नऊ महिन्यापूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले आहेत. हे रस्ते कोणत्या निधीतून केले आहेत तसेच केलेले रस्ते नगर परिषदेकडे वर्ग केले आहेत का केले असतील तर ते कधी केले याची माहिती पांढरे यांनी नगर परिषदेला दोन वेळा लेखी पत्राद्वारे मागितली होती.

मात्र ती माहिती देण्यास नगर परिषदेने टाळाटाळ केली. तसेच माहिती कधी देणार या बाबतचे लेखी पत्र ही पांढरे यांना दिले नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवार ता 6 रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालना समोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.

नगरपरिषदेने असे कोट्यावधी रुपये खर्चून खाजगी जागेत रस्ते केले आहेत, या बाबत असा आरोपही पांढरे यांनी केला आहे. माहिती न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे पांढरे यांनी सांगितले.

दरम्यान या संदर्भात बांधकाम विभागाचे अभियंता गणेश बागल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पांढरे यांच्या आंदोलनाचा विषय नगरपरिषदेतील बांधकाम विभागाचा आहे. त्यामुळे ते अधिकारी पाहून घेतील.

डॉ योगेश डोके, मुख्याधिकारी मोहोळ नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT