Mohol panic due to drone-like objects flying at night solapur shakti singh  esakal
सोलापूर

Solapur News : मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात आकाशात रात्री ड्रोन सदृश्य वस्तू फिरल्याने घबराहट

घरापासून सुमारे 60 ते 70 फूट उंचीवरून ते फिरत असून "लेझर लाईट' प्रमाणे त्याचा उजेड पडतो आहे.

राजकुमार शहा

मोहोळ : तालुक्यातील काही भागात रात्री आठ ते अकरा वाजे पर्यंत ड्रोन सदृश्य वस्तू आकाशातून फिरत असल्याने नागरिकात घबराहट पसरली आहे. दरम्यान ते ड्रोन नसून लहान विमाने असल्याचा निर्वाळा बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी शक्ती सिंग यांनी दिला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्या भरापासून आकाशात ड्रोन सदृस्य वस्तू फिरताना पापरी ता मोहोळ येथील काही शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी पाहिले. घरापासून सुमारे 60 ते 70 फूट उंचीवरून ते फिरत असून "लेझर लाईट' प्रमाणे त्याचा उजेड पडतो आहे.

त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक नागरिकांनी या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती कळविली. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेतली असता बारामती जिल्हा पुणे येथे दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहेत. त्या केंद्राच्या माध्यमातून नवीन वैमानिकांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्यांच्या कडून सराव करून घेण्यात येतो.

हे प्रशिक्षण रात्री दिले जाते. ज्या भागात सरावासाठी जायचे आहे तेथील प्रशासनाची परवानगी घेतली जाते. हे ड्रोन नसून लहान विमाने असल्याचे प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक शक्ती सिंग यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT