Kajal Namade sakal
सोलापूर

Sub Inspector of Police : पाटकुलच्या शेतकऱ्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक

मुलीची शिक्षणाची जिद्द व चिकाटी लहान पणापासूनच होती, त्यामुळे तिच्या शिक्षणाला घरच्या अडचणी बाजूला ठेवून प्राधान्य दिले.

राजकुमार शहा

मोहोळ - मुलीची शिक्षणाची जिद्द व चिकाटी लहान पणापासूनच होती, त्यामुळे तिच्या शिक्षणाला घरच्या अडचणी बाजूला ठेवून प्राधान्य दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन काजल राजकुमार नामदे हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानंतर आला. शेतात केलेल्या कष्टाचे चीज झाले असल्याचे काजलचे वडील राजकुमार नामदे यांनी सांगीतले.

काजल ही पाटकुल येथील राजकुमार नामदे या शेतकऱ्याची मुलगी. शेतात कष्ट करून मुलीच्या शिक्षणाची सोय केली, तिने ही परिस्थितीची जाणीव ठेवून यश संपादन केल्याने आमचा आत्मविश्वास वाढल्याचे नामदे यांनी सांगितले.

आज पर्यंत तिला कुठलीही शिकवणी व अकॅडमी लावली नव्हती. काजल हिचे माध्यमिक शिक्षण गावातील शिवाजी हायस्कूल मध्ये झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात झाले. सन 2018 साली पुणे येथील शासकीय महाविद्यालयातून 83 टक्के गुण मिळवुन परीक्षा उत्तीर्ण झाली.

कृषी क्षेत्रातील बीएससी ऍग्री ही पदवी तिने संपादन केली. आई-वडील, भाऊ, तसेच इतर नातेवाईक व शिक्षकांची प्रेरणा मिळाल्यानेच मी हे यश संपादन करू शकल्याचे काजल हिने सांगितले. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

Thane News: शहाड उड्डाणपुलावर २० दिवस वाहनांना नो एन्ट्री! वाहतूक कशी होणार?

BEST Employees Protest: बेस्ट कर्मचाऱ्यांची आंदोलनाची हाक! मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आक्रमक इशारा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरात शिंदे सेनेच्या मेळाव्यापूर्वी कर्मचाऱ्याला विजेचा धक्का

SCROLL FOR NEXT