Drinker 
सोलापूर

मोहोळ तालुक्‍यात दारू पिऊन एकाची आत्महत्या तर एकाचा मृत्यू ! 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यात दारू पिऊन दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना सारोळे (ता. मोहोळ) येथे तर दुसरी घटना सय्यद वरवडे येथे घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तात्याराव मनोहर जाधव (वय 25, रा. चिखली, हल्ली मुक्काम सारोळे) हा सारोळे येथील शेतात वस्ती करून राहात होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याने मंगळवारी (ता. 17) सकाळी नऊ वाजण्यापूर्वी राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. या घटनेची खबर मनोहर विठ्ठल जाधव यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे. 

दुसरी घटना सय्यद वरवडे येथे मंगळवारी (ता. 17) दुपारी बारा वाजता घडली. श्‍याम रावसाहेब पाटील (वय 65, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृताचे नावी आहे. श्‍याम पाटील हा आचारी म्हणून वेगवेगळ्या हॉटेलांत काम करीत होता. तो वयोवृद्ध होता व त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या पायाला सूजही आली होती. या सर्व आजारांमुळे त्याचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर गिरीश रमेश पारवे (रा. पाडोळे वस्ती, सय्यद वरवडे) यांनी पोलिसांत दिली आहे. दोन्ही घटनांचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आई गरुडाने चुकून दिला अंड्यावर पाय, रात्रभर होती दुःखात; मग घरट्यात ठेवलं दुसरं अंडं, पुढे काय घडलं बघा...

Makar Sankranti 2026 Recipes: पारंपारिकतेला आधुनिक ट्विस्ट; यंदा मकर संक्रांतीसाठी बनवा 'हे' ५ नवीन तिळाचे गोड पदार्थ

SBI Job Vacancy 2026: बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती; 1,146 जागांवर होणार नियुक्ती, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Nashik Crime : बसस्थानकांवरील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारी 'लेडी चोर' जेरबंद; सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग

घरोघरी प्रचार मागे, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स पुढे! बीएमसी निवडणुकीत प्रचाराचे डिजिटल रूप; व्हॉट्सअ‍ॅप ठरतेय उमेदवारांचे मुख्य अस्त्र

SCROLL FOR NEXT