Vitthal-Rukmini Temple 
सोलापूर

दीड महिन्यात विठुरायाच्या चरणी पाऊण कोटीचे दान ! 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरपासून विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्याने देणगीमध्येही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, लाकडाउनमुळे मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीवर आणि उत्पन्नावर परिणाम झाला होता. लॉकडाउननंतर श्री विठ्ठलाचे द्वार मुखदर्शनासाठी खुले झाल्यानंतर आता पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे आता उत्पन्नात देखील समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. 

गेल्या दीड महिन्याच्या काळात आजअखेर देवाच्या दानपेटीमध्ये पाऊण कोटी रुपयांचं दान भाविकांनी टाकले आहे. "कोव्हिड - 19'चे सर्व नियम पाळून मंदिर समितीने मुखदर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या दर दिवसाला 4 हजार 800 भाविकांना ऑनलाइन मुखदर्शन दिले जात आहे. 16 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 78 हजार 500 भाविकांनी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले आहे. ऑनलाइन आणि दानपेटीतील देणगी मिळून आजअखेर 74 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे. यंदा कोरोनामुळे देणगी कमी असली तरी दहा महिन्यांनंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. नववर्षाच्या निमित्ताने सुद्धा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT