लसीकरणाचा वेग वाढला 
सोलापूर

सोलापूरकरांचे हात गुंतले लस निर्मितीत

प्रकाश सनपूरकर

जेवढ्या आधुनिक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कालावधीत प्रात्यक्षिक करण्यासाठी उपलब्ध होतील, तेवढ्याप्रमाणात पुढील काळातील त्यांच्या करिअरमधील आव्हांनाना सामोरे जाण्याची संधी उपलब्ध होते.

सोलापूर: जिल्ह्यातील तब्बल 70 हून अधिक विद्यार्थी बायोटेक्‍नॉलॉजीच्या शिक्षणानंतर कोरोनाच्या साथीत कोविड लस उत्पादनाच्या कामात त्यांचे योगदान देत आहेत. सोलापूरच्या तरुणांनी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे ही अभिनव कामगिरी बजावली आहे.

कोरोनाच्या साथीच्या काळात कोरोना लस निर्मिती हे अत्यंत महत्वाचे आव्हान भारतीय लस निर्मात्यासमोर निर्माण झालेले होते. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी लस निर्मिती व उत्पादनाचे काम सुरु केले. या कंपन्यामध्ये बायोटेक्‍नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले मनुष्यबळ हवे असते. या शिक्षणात प्रात्यक्षिकांची खूप गरज असते. जेवढ्या आधुनिक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कालावधीत प्रात्यक्षिक करण्यासाठी उपलब्ध होतील, तेवढ्याप्रमाणात पुढील काळातील त्यांच्या करिअरमधील आव्हांनाना सामोरे जाण्याची संधी उपलब्ध होते.

सुरवातीला वडाळा येथील लोकमंगल बायोटेक्‍नॉलॉजी महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी लस निर्मिती कंपन्यामध्ये जॉईन झाले. तेव्हापासून सातत्याने सोलापूरचे तरुण लस निर्मिती कंपन्यामध्ये रुजू होण्याचे प्रमाण वाढले. विशिष्ट सकारात्मक कार्यपध्दतीने सोलापूरच्या तरुणांची विशेष ओळख बनली. त्यामुळे पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांनादेखील संधी मिळत गेली. त्यानंतर बायोटेक्‍नॉलॉजी विषयाचे पदवी अभ्यासक्रम वालचंद इन्स्टिट्यूट व शिवदारे महाविद्यालयात सुरू झाले. त्यामुळे या विषयात शिक्षण करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. कोरोना लस उत्पादन क्षेत्रात सोलापूरचे 70 पेक्षा अधिक तरूणांचे करिअर झाले आहे. कोरोनानंतर लस उत्पादन कंपन्यासोबत डॉ. रेडीज, माय लॅब, झायला, हेटेरोसारख्या अनेक कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअर संधी वाढल्या आहेत.

ठळक बाबी

- सोलापूरमध्ये तीन बायोटेक्‍नॉलॉजी महाविद्यालये

- अत्याधुनिक प्रयोगशाळांच्या आधारे शिक्षणाने करिअरच्या वाढत्या संधी

- मोल्युक्‍युलर बायोलॉजी लॅब व पीसीआर उपकरणाचा प्रभावी उपयोग

- लसनिर्मिती व कोविड टेस्ट किट निर्मिती उद्योगात करिअर

- बायोटेक्‍नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षणक्रम यावर्षीपासून लोकमंगल महाविद्यालयात सुरू

- पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून अभ्यासक्रम सुरु होण्याची शक्‍यता

आमच्या महाविद्यालयातील वर्ष 2008 च्या बॅचचे विद्यार्थी लसनिर्मिती कंपन्यामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यानंतरच्या बॅचचे अनेक विद्यार्थीही या लसनिर्मिती कंपन्यात सेवा बजावित आहेत.

- डॉ. किरण जगताप, प्र.प्राचार्य, लोकमंगल बायोटेक्‍नॉलॉजी महाविद्यालय, वडाळा, ता.उत्तर सोलापूर

बायोटेक्‍नॉलाजीचा अभ्यासक्रम स्वीकारल्याननंतर त्याचा उपयोग पुढील काळात चांगल्या पध्दतीने होऊ शकतो, हा विश्‍वास आता मिळाला आहे.

- विजय जाधव, माजी विद्यार्थी, लोकमंगल बायोटेक्‍नॉलाजी कॉलेज, वडाळा

बायोटेक्‍नॉलॉजी ही ऍप्लाईड सायन्स शाखा आहे. विकसित देशात त्याचा उपयोग फार अधिक होत असे. मात्र आता कोरोनानंतर हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत चालले आहे. पुढील काळात या क्षेत्रात चांगल्या संधी असणार आहेत.

- औदुंबर झाडे, माजी विद्यार्थी, लोकमंगल बायोटेक्‍नॉलॉजी कॉलेज, वडाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! GSB सेवा मंडळाच्या गणपतीला ७०३ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT