jai-siddheshwar-swamy 
सोलापूर

अरेच्चा ! खासदार डॉ. महास्वामींनी मूळ जात प्रमाणपत्र दिलेच नाही 

तात्या लांडगे

सोलापूर : खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी बेडा जंगमच्या दाखल्याची प्रत जोडून लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला. डॉ. महास्वामींचा दाखला बनावट असल्याची तक्रार करीत प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे अपिल केले. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीवेळी जात पडताळणी समितीने मूळ दाखल्याची मागणी केली. मात्र, सुनावणी पूर्ण होवूनही मूळ दाखलाच खासदार डॉ. महास्वामी यांनी सादर केला नसल्याचे जात पडताळणी समितीने स्पष्ट केले. 


अनुसूचित जातीचा बेडा जंगम असल्याचे पुरावे डॉ. महास्वामी यांनी दिले. प्रत्येक पुराव्याची दक्षता पथकाद्वारे पडताळणी करण्यात आली, मात्र त्यापैकी एकही पुरावा खरा नसल्याचा अहवाल दक्षता पथकाने जात पडताळणी समितीला सादर केला. काही ठिकाणी सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचेही निरीक्षण दक्षता पथकाने नोंदवले. समितीने डॉ. महास्वामी यांचा दाखला अवैध ठरविला असून आता सोलापूर न्यायालयात त्यांच्याविरुध्द फिर्याद दाखल करावी, असे निर्देश अक्‍कलकोट तहसिलदारांना दिले आहेत. त्यानुसार दक्षता पथकाने सोमवारी (ता. 24) अक्‍कलकोट तहसिल कार्यालय गाठले, मात्र तहसिलदार रजेवर असल्याने ते रिकाम्या हाताने परतले. तहसिलदारांनी न्यायालयात फिर्याद द्यावी आणि डॉ. महास्वामी यांच्याकडील जातीचा दाखला जप्त करुन त्याचा अहवाल जात पडताळणी समितीला द्यावा, असेही निर्देश दिले आहेत. आता तहसिलदार रजेवर असतील, परंतु त्यांना फिर्याद द्यावीच लागेल आणि दाखला जप्त केल्याचा अहवालही सादर करावा लागेल, असेही समितीने स्पष्ट केले आहे. 


न्यायालयात फिर्याद द्यावीच लागेल 
खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी त्यांच्याकडील जातीचा मूळ दाखला द्यावा, अशी मागणी सातत्याने केली. मात्र, जात पडताळणी समितीला मूळ दाखला देण्यात आला नाही. सुनावणीच्या शेवटच्या दिवशी दाखला गहाळ झाल्याची वळसंग पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीची प्रत देण्यात आली. 
- ज्ञानदेव सूळ, अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

Horoscope Astrology : 'या' 3 राशींचे लोक खूप वर्षे जगतात, उतार वयात मिळतं सगळं सुख..पाहा यात तुमची रास आहे का?

Lasalgaon News : कर्मवीर बंधारा तुटला, पूल व रस्ता वाहून गेल्याने गोळेगाव-गोंदेगाव वाहतूक ठप्प; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

NZ vs WI : वेस्ट इंडिजने ६.२ षटकांत १०६ धावा चोपल्या, पण विजयासाठी ४ चेंडूंत ७ धावा नाही करता आल्या; भन्नाट मॅचने जिंकली मनं...

SCROLL FOR NEXT