Ad. Sathe 
सोलापूर

माढ्याच्या नगराध्यक्षा ऍड. साठे म्हणाल्या, विकासकामांसाठी साडेचार कोटी मिळाले; आणखी निधीची आवश्‍यकता

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढ्यातील विविध विकास कामांसाठी साडेचार कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगरपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ऍड. साठे म्हणाल्या, की सुवर्ण नगरोत्थान योजनेतून तीन कोटी 90 लाख तर नागरी वस्ती सुधार योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 

या निधीतून विठ्ठल मंदिरासमोर कंपाउंड वॉल बांधणे, शहरातील विविध वाड्या - वस्त्यांवर विद्युत पोल तारांसह उभा करणे, माढेश्वरी मंदिरा शेजारील हिंदू स्मशानभूमीचा रस्ता, संरक्षक भिंत, माढ्यातील नाल्याचे मोठ्या बंदिस्त गटारीत रूपांतर करण्यात येणार आहे. माढा महातपूर रोड ते साठे वस्ती खडीकरण रस्ता, भांगे वस्ती अंतर्गत रस्ते यासह शहरातील रस्ते, पेव्हिंग ब्लॉक यासह अन्य विकासकामे मार्गी लागणार आहेत. 

केंद्राच्या निधी अभावी पंतप्रधान आवास योजनेची कामे रखडली आहेत. अनेकवेळा पाठपुरावा करूनही निधी आलेला नाही. मात्र राज्य शासनाचा निधी मिळाला असल्याचे ऍड. साठे यांनी सांगितले. माढ्यात पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतून 582 घरकुले मंजूर असून, ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. 

आणखी अडीच कोटींच्या विकास कामांचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला असून, त्या कामांना देखील लवकरच मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत पालकमंत्री दतात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. 

या वेळी नगरसेवक शहाजी साठे, राहुल लंकेश्वर, प्रभाकर जाधव, गंगाराम पवार, नगरसेविका अनिता सातपुते, सभापती कल्पना जगदाळे, सभापती सुप्रिया बंडगर, वनिता शहाणे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चौथ्या वाघावर शिक्कामोर्तब, कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन

Winter Body Detox: औषधांची गरज नाही; हिवाळ्यात शरीर डिटॉक्स करण्याचे ५ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT