crime
crime Sakal
सोलापूर

प्रेमप्रकरणातून वाटंबरेच्‍या तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा - आपल्‍या नातेवाईकाच्‍या मुलीशी असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून चिडून जाऊन तिच्‍या प्रियकराच्या डोक्यात व पोटावर मारून खून केल्याची घटना तालुक्यातील गोणेवाडी हद्दीत घडली. तुषार सूरज धनवडे (वय २५, रा.वाटंबरे ता.सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय भारत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १२ तासात शिरशी शिवारातून त्‍यास ताब्यात घेतले. फिर्याद मृत तरुणाचे वडील सुरज पंढरीनाथ धनवडे (वय ४९ रा.वाटंबरे ता. सांगोला) यांनी मंगळवेढा पोलिसात दिली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीचा मुलगा तुषार हा गावातील मुलांसमवेत पेटींगची कामे गावात व इतर भागात करीत होता. तुषारचे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी सहा महिन्‍यापासून प्रेमसंबंध होते. यापूर्वी याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्‍यावेळी प्रकरण आपआपसात मिटवण्यात आले होते. त्यावेळेस संशयित आरोपी दत्तात्रय शिंदे याने मी तुषार यास जिवंत सोडणार नाही, त्याचे हात, पाय काढून टाकतो, अशी धमकी दिली होती.

फिर्यादीचा मुलगा तुषार हा त्याच्या भावकीतील लग्नकार्यासाठी वाटंबरे येथे गेला होता. त्या लग्नाला त्याचा पाटखळचा मित्र देखील आला होता. त्या मित्रास सोडण्यासाठी पाठखळ येथे जातो म्हणून तो गेला. (ता. २) जून रोजी फिर्यादीला मुलाचा गोणेवाडी हद्दीत खून झाल्याचे पोलिस पाटील यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी पोलिस पथके तयार करून संशयित आरोपीस १२ तासाच्या आत शिरसी परीसरातील जंगलातून ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT