Muruma has been stolen from government land in Jawalgaon 
सोलापूर

जवळगाव येथील शासकीय जमिनीतील मुरूमाची चोरी

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर)  : शासकीय जमिनीतून मुरूम चोरीचा प्रकार वैराग भागातील जवळगाव नं. 2 येथे घडला आहे. बार्शी न्यायालयात खासगी फौजदारी फिर्याद दाखल करताच न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश वैराग पोलिसांना दिले आहेत.

आम्ही लस घेतली तुम्ही पण घ्या ! जिल्ह्यातील 63 हजार ज्येष्ठ नागरिकांसह दीड लाखजणांनी घेतली लस

विष्णू बाबासाहेब कापसे यांनी गावकामगार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, वैराग पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक, गौण खनिज अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. यापैकी कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे बार्शी येथील न्यायालयात धाव घेतली. संशयित आरोपींनी (ता. 15) नोव्हेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत जवळगाव नं. 2 मधील शासकीय मालकीचे गट नं.194/1 मधील गायरान जमीन खोदून त्यातील सुमारे एक हजार ट्रॅक्‍टर ट्रॉली भरून अंदाजे 1 हजार 200 ते 1 हजार 300 ब्रास मुरूम विना नंबरच्या जेसीबी व ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने जवळगाव नं. 2 ते हत्तीज शिव रस्त्यावर बेकायदेशीरपणे व शासकीय परवानगीशिवाय त्यांचे स्वतःच्या शेतात खाजगी रस्ता तयार करण्यासाठी टाकला आहे. 

बेकायदा मुरूम वाहतुकीसाठी हेतूपुरस्सर विनानंबरचे ट्रॅक्‍टर ट्रॉली व जेसीबीचा वापर केला आहे. याची तक्रार गावकामगार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पण त्यांनीही दखल घेतली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या वतीने ऍड. प्रशांत एडके, ऍड. सुहास कांबळे, ऍड. समाधान सुरवसे व ऍड. सफराज इनामदार, सूरज वाणी यांनी काम पाहिले. 

तपासाचेही आदेश 

न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला असता संशयित आरोपी परमेश्वर अंबऋषी ढेंगळे, अर्जुन बापू ढेंगळे, समाधान रावसाहेब ढेंगळे, रावसाहेब मच्छिंद्र ढेंगळे (सर्व रा. जवळगाव नं. 2, ता. बार्शी) यांच्यावर गौण खनिज अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा, प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश वैराग पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT