सोलापूर

गवंडी काम करणाऱ्या वडिलांची मुलगी आंतराष्ट्रीय पातळीवर मारली मजल

तात्या लांडगे

कोल्हापूर, पुणे याठिकाणी शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच तिने बॅडमिंटनचा छंद जोपासला.

सोलापूर: आठवी-नववीपासून पॅरा बॅडमिंटनची आवड निर्माण झाल्यापासून आरती पाटील हिने खेळात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले. वडिल गवंडी काम तर भाऊ त्यांच्या मदतीला असतो. तीन बहिणींमध्ये आरतीला खेळाची आवड. कोल्हापूर, पुणे याठिकाणी शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच तिने बॅडमिंटनचा छंद जोपासला. पाहता पाहता आरतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली. आतापर्यंत तिला 11 ब्रॉंझ, 12 गोल्ड आणि पाच सिल्व्हर मेडल मिळाले आहेत.

घरची परिस्थिती बेताची असतानाही वडिलांनी आरतीला तिचा छंद जोपण्याचे स्वातंत्र दिले. आज आरती ही राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 16 व्या क्रंमांकावरील खेळाडू झाली आहे. आई-वडिलांची आशा तिने पूर्ण करून यशाच्या शिखराकडे वाटचाल सुरु ठेवली. आता तिला 2024 मध्ये होणाऱ्या ऑलंम्पिकमध्ये सहभागी व्हायचे आहे. बॅडमिंटनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावा, हे स्वप्न आरतीने बालवयातच पाहिले. सायना नेहवाल यांच्या सारखे आपणही खेळाडू होऊ शकतो, असा आरतीला आत्मविश्‍वास होता. त्यानंतर तिला चांगले प्रशिक्षक मिळाले. सुरवातीला जिल्हास्तरीय सामन्यांपासून तिने खेळाला सुरवात केली.

जिल्हास्तरावर दोनदा गोल्ड मेडल मिळाल्यानंतर आरतीचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले. जिल्हास्तरावर नावलौकिक झाल्यानंतर आरतीला राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली. राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून बेंगलोर येथे सामने झाले. त्याठिकाणीही मोठे यश मिळाले आणि 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जपानला जाण्याची संधी मिळाली. जपानमध्ये इंटरनॅशनल ओपन टुरनामेंटमध्येही तिने यश मिळविले. त्यानंतर एशियएन युथसाठी निवड झाली आणि त्या स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. आरतीला टप्प्याटप्याने दुबई, डेन्मार्क, युगांडा, स्विर्झलॅंड येथे पार पडलेल्या सामन्यांमध्येही खेळण्याची संधी मिळाली. त्याठिकाणी सातत्याने ब्रॉंझ, सिल्व्हर अशी पदके मिळविली. सोलापूरमध्ये आरतीला सुनिल देवांग हे प्रशिक्षण देत आहेत.

ठळक बाबी...

- आरतीला राष्ट्रीय स्तरावर 22 तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चार पदके मिळाली

- खेळाच्या माध्यमातून आरतीने मिळविला राज्यस्तरीय साफल्य उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार

- 2024 मध्ये होणाऱ्या ऑलंम्पिक स्पर्धेसाठी खेळायला संधी मिळावी हीच आरतीचे स्वप्न

- आठवी-नववीपासून आरतीने जोपासला पॅरा बॅडमिंटनचा छंद

- राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आरती 16 व्या क्रमांकावरील खेळाडू

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यात पॅरा बॅडमिंटनचा सराव सुरु केला. मात्र, कौटुंबिक परिस्थिती बेताची असून वडिल, भाऊ गवंडी काम करतात. त्यामुळे सोलापुरातच सराव सुरु ठेवला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळाला, परंतु ऑलंम्पिकमध्ये आता मेडल मिळवायचे आहे.

- आरती पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पॅरा बॅडमिंटन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: ' तुम्हाला 15 मिनिट पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील...'; नवनीत राणांच्या वक्तव्यावरुन AIMIM आक्रमक

Weather Update: नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून विदर्भासह 'या' भागात ऑरेंज अलर्ट

Jacqueliene Fernandez: सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पुन्हा लिहिलं पत्र; दिलं 'हे' वचन

IPL 2024 Playoffs : पांड्याच्या मुंबईने पकडली घरची गाडी... आता कोणत्या संघाचा लागणार नंबर? जाणून घ्या प्लेऑफचे गणित

Latest Marathi News Live Update : हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालांचा अविश्वास प्रस्तावाला बाहेरून पाठिंबा

SCROLL FOR NEXT