Kamgar cell 
सोलापूर

कोरोनावर कोट्यवधींचा खर्च पण वीज ग्राहकांवर दया का नाही? "राष्ट्रवादी'चा मुख्यमंत्र्यांना सवाल 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : शहरात कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून अनेक उद्योगधंदे बंद होते. अनेक उद्योग पूर्वपदावर येत नसल्यामुळे असंख्य कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, पण आर्थिक संकटात सापडलेल्या वीज ग्राहकांवर सरकारला का दया येत नाही, असा सवाल राष्ट्रवादी कामगार सेलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केला आहे. 

शासनाने वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार सेलचे डॉ. गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 9) अशोक चौक परिसरात "कंदील लगाओ' आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले. या वेळी अंबादास देविदास, सतीश दासरी, तिम्मप्पा मादगुंडी, सतीश गोरंटला, अरविंद कस्तुरी, शंकर यन्नम, गणेश शेरला, लक्ष्मीनारायण येलदी, विष्णू गुंडेटी, राजेशम्‌ कल्याणम्‌, अंबव्वा रिकमल्ले, नरसिंग गज्जेली, लक्ष्मण आवार, गंगाधर वग्गा आदींसह वीज ग्राहक उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले, की शहरात कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लहान-मोठे यंत्रमाग कारखाने, लघुउद्योग, सतरंजी कारखाने, हॉटेल्स, किराणा दुकानदार, मंडप कॉन्ट्रॅक्‍टर, लाऊड स्पीकर तसेच अनेक उद्योग पूर्वपदावर येत नसल्यामुळे असंख्य कामगारांना देखील काम मिळत नसून कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. तसेच मध्यमवर्गीय कुटुंबीय व उद्योगधंदे व्यवस्थित चालत नसल्यामुळे उद्योजकही आर्थिक संकटात सापडले आहेत. वास्तविक पाहता शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि कोरोनाच्या सावटाखाली जनतेची दशा बदलली आहे. अशा परिस्थितीत वाढीव वीजबिल भरणे शक्‍यच नसल्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंधारमय झाले आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांची वीजबिले माफ करून दिलासा द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT