rto office sitiuation  
सोलापूर

अरेच्चा : मार्चएण्डमुळे आरटीओच चितेंत.... का ते नक्‍की वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : मार्चएण्डच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच विभागांना उद्दिष्टपूर्तीच्या सक्‍त सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत. मात्र, सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. सोलापूर कार्यालयाला 18 पदे मंजूर झाली आहेत परंतु, सद्यस्थिती दोन अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरु आहे. 2019- 20 मध्ये सोलापूर कार्यालयास 175 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, परंतु जानेवारीअखेर 113 कोटींची वसुली झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण कसे होणार, याची चिंता अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. 


शहर-जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी, रस्ते अपघात कमी व्हावेत, वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने सातत्याने दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे. बेशिस्त वाहनचालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबीतही केले जातात. दुसरीकडे राज्य परिवहन आयुक्‍तालयाने दिलेले दरवर्षीचे उत्पन्नाचे उद्दिष्टेही पूर्ण करण्याच्या निमित्ताने स्कूल बससह अन्य वाहनांची तपासणी नियमित करणे अनिवार्य आहे. मात्र, सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कायार्लयातील अधिकाऱ्यांची 70 टक्‍के पदे रिक्‍त असल्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. दुसरीकडे बेशिस्त वाहतूकही वाढली असून अपघातात वाढ झाल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी परिवहन आयुक्‍तांकडे पुरेशा मनुष्यबळाची मागणी केली आहे. 


रिक्‍त पदांमुळे अडचणी 
सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास 34 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी 33 पदे रिक्‍त आहेत. तर 24 मोटार निरीक्षकांपैकी 13 पदे भरली असून 11 पदे रिक्‍त आहेत. 11 मोटार निरीक्षकांची भरती झाली असून ते आता प्रशिक्षणाला गेले आहेत. 175 कोटींच्या उद्दिष्टापैकी 113 कोटींची वसुली झाली आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 


आरटीओ कार्यालयाची स्थिती 
वसुलीचे उद्दिष्टे 
175.07 कोटी 
जानेवारीपर्यंत वसुली 
113.19 कोटी 
सहायक मोटार वाहन निरीक्षकांची रिक्‍त पदे 
33 
मोटार वाहन निरीक्षकांची रिक्‍त पदे 
11 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT