सीना नदीची उपनदी असणाऱ्या व सीनेपासून अवघ्या 23 किमी अंतरावरील भोगावती नदीचे पात्र अजूनही कोरडेच आहे.
सोलापूर : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीना-भोगावती जोडकालव्याच्या सर्व्हेसाठी 14.41 लाख रुपयांचा निधी मंजूर करून सर्व्हे करण्यात यावा, असे पत्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी सोलापूर येथील बैठकीत दिले आहे. मात्र, या प्रकल्पाला मूर्त रूप मिळण्यासाठी या निधीची तरतूद आणि उजनी धरणातील (Ujani Dam) पाण्यावर या प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्याची गरज आहे. (Need to reserve water from Ujani dam for Sina-Madha joit canal-ssd73)
(कै.) सुशांत कादे यांनी हा मुद्दा मागील 25 वर्षांपासून उचलून धरला होता. युती सरकारच्या काळात सीना नदीला कॅनॉलचा दर्जा मिळून बोगद्याद्वारे उजनी धरणाचे पाणी सीना नदीत (Seena River) आले. सीना नदीची उपनदी असणाऱ्या व सीनेपासून अवघ्या 23 किमी अंतरावरील भोगावती नदीचे पात्र अजूनही कोरडेच आहे. 23 किलोमीटरचा सीना-भोगावती जोड कालवा झाल्यास भोगावती काठच्या बार्शी (Barshi), माहोळ (Mohol), माढा (Madha) व उत्तर सोलापूर (North Solapur) या चारही तालुक्यांतील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व वैराग परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, यासाठी सुशांत कादे यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यांचे अधुरे स्वप्त पूर्ण करण्यासाठी सीना-भोगावती जोडकालवा संर्घष समितीने पाठपुरावा केल्याने शनिवारी आमदार यशवंत माने (MLA Yashwant Mane) यांनी दिलेल्या शिफारस पत्रावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सर्व्हे करावा, असे आदेश दिले आहेत. या सर्व्हेमुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. मात्र, हा पुरेसा प्रयत्न नसून यापूर्वी दोन वेळा या प्रकल्पासाठी सर्व्हे होऊन हा प्रकल्प शक्य असल्याचा व कोणत्याही बाह्य ऊर्जेशिवाय सायफन पद्धतीने सीना नदीतून पाणी भोगावती नदीत आणणे शक्य असल्याचे पूर्वीच्या सर्व्हेतून स्पष्ट झालेले आहे.
समन्यायी पाणीवाटपानुसार मिळावा उजनीच्या पाण्यात हिस्सा
पूर्वीपासून भोगावती नदी (Bhogawati River) ही वर्षातील आठ ते दहा महिने कोरडी असल्यामुळे बार्शी तालुक्यातील वैराग परिसर व मोहोळ तालुक्यातील उत्तरेकडील मनगोळी, वाळूज, देगाव, नरखेड परिसरात सातत्याने पाणीटंचाई भासत आहे. उजनी धरणातील पाण्याचा लाभ प्रामुख्याने करमाळा (Karmala), पंढरपूर Pandharpur) व माढा तालुक्यांना झाला. मात्र, बार्शी आणि मोहोळ तालुक्याच्या वाट्याला उजनी धरणाच्या पाण्याचा लाभ झालेला नाही. अगदी उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांसाठी योजना कार्यन्वित झाल्या; मात्र मोहोळ तालुक्यासाठी असलेल्या या योजनेच्या नावाने अद्याप पाणी आरक्षित करण्यात आलेले नाही. या योजनेतील नियोजित लाभक्षेत्राचा विचार करून यासाठी पाणी आरक्षित होणे आवश्यक आहे.
या योजनेमुळे अत्यंत कमी खर्चातील व अवघ्या 23 किलोमीटरच्या जोडकालव्यामुळे अनेक गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता सीना- भोगावती जोडकालव्याला गती देण्यात यावी.
- डॉ. संदेश कादे, नूतन अध्यक्ष, सीना-भोगावती जोडकालवा संर्घष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.