सोलापूर

"या' जिल्ह्यात अनुकंपा भरतीसाठी नवा निर्णय 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्यावतीने अनुकंपा भरती केली जाणार आहे. शासनाच्या दिलेल्या सूचनांनुसार 20 टक्के भरती केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीतील दहावी उत्तीर्णच्या पुढे शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मंगळवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केली जाणार आहे. किमान दहावी व त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनीच या पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पडताळणी शिबिरामध्ये जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केलेला असावा. सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आता अर्ज केलेला असावा. कुटुंबातील वारसाचे प्रमाणपत्र, अनुकंपा नोकरी देण्यासाठी कुटुंबातील अन्य वारसांचे संमतिपत्र, कुटुंबातील कोणतेही सदस्य शासकीय-निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, कर्मचाऱ्याच्या पत्नीने अनुकंपासाठी अर्ज केला असल्यास पुनर्विवाह न केल्याचे प्रतिज्ञापत्र, शैक्षणिक अर्हता, जन्म तारखेशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, कर्मचाऱ्याच्या मृत्यूपश्‍चात कुटुंब निवृत्ती वेतन व मिळालेल्या इतर लाभाचे आदेश, कर्मचाऱ्याचा मृत्यू दाखला या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांनी वरील कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह मंगळवारी (ता. 25) होणाऱ्या पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे. 

तर अनुकंपा नियुक्तीचा विचार नाही 
प्रशासनाच्यावतीने मंगळवारी (ता. 25) ठेवलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहायचे आहे. पडताळणीच्या दिवशी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीचा विचार केला जाणार नसल्याचेही सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे. तशाप्रकारची पत्रही संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT