Madha Lok Sabha Election Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha Election: माढ्याच्या उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट! शरद पवारांनी दिल्लीत घेतली मोठ्या नेत्याची भेट; आता 'या' नावाची चर्चा

Madha Lok Sabha Election: माढ्याच्या उमेदवारीबाबत शरद पवार व प्रवीण गायकवाड यांची रविवारी (ता. ३१) दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगोला : ‘आमचं ठरलंय’ असे म्हणणारे मोहिते- पाटलांचा अजून कोणताच निर्णय होत नाही. मोहिते- पाटलांचा ‘तुतारी’चा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व शरद पवारांचे विश्वासू असलेले प्रवीण गायकवाड यांनी मोहिते- पाटलांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार असल्याचे सांगितल्याने माढ्याच्या उमेदवारीचा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. माढ्याच्या उमेदवारीबाबत शरद पवार व प्रवीण गायकवाड यांची रविवारी (ता. ३१) दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ‘आमचं ठरलंय’ असे सांगत मोहिते- पाटील माढ्यामधून भाजपकडे उमेदवारीची तिकीट मागत होते. परंतु भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनाच तिकीट दिले. त्यामुळे नाराज असलेले धैर्यशील मोहिते- पाटील हे शरदचंद्र पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघातूनही तुतारी चिन्हावर लढावे, यासाठी मोहिते- पाटलांवर दबाव वाढत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. परंतु याबाबत मोहिते- पाटील कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे माढ्याबाबत शरदचंद्र पवार गटाकडून नवी खेळी खेळली जात आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी रविवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन माढ्याच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले, की माढा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते- पाटील निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यांनी माढ्याच्या बालेकिल्ल्यात तुतारीच्या चिन्हावर लढावे, ते निश्चितपणे निवडून येतील. परंतु त्यांनी तुतारी हाती न घेतल्यास मी स्वतः माढ्यातून लढण्यास तयार असल्याचे शरद पवारांना सांगितले आहे.

मोहिते- पाटलांनी लवकर निर्णय न घेतल्यास मी जोमाने तुतारी हाती घेऊन माढा निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे सांगितले. पवारांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने माढ्याच्या उमेदवारीबाबत नवीन ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रवीण गायकवाड यांना तयारीत राहण्याचे आदेश

माढा मतदारसंघातून सुरवातीला शरदचंद्र पवार गटाने रासपचे महादेव जानकरांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच केले होते. परंतु ऐनवेळी महादेव जानकर महायुतीबरोबर गेल्याने मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार म्हणून शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख मतदारसंघात फिरू लागले आहेत. परंतु संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेले व समाजाचा चेहरा म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेले प्रवीण गायकवाड यांना शरद पवार यांनी माढा लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिल्याने नवखा उमेदवार माढ्याला महाविकास आघाडीकडून मिळणार का? याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.

धैर्यशील मोहिते-पाटील अपक्ष लढतील?

भाजपकडून तिकीट डावलल्यावरही मोहिते- पाटील यांनी मतदारसंघातील तालुकानिहाय दौरे सुरूच ठेवले आहेत. ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत सलगपणे मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते. तरीही मोहिते- पाटील सध्या तुतारी हाती घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून माढा निवडणूक लढवतील का? याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहिते-पाटील अपक्ष राहिल्यास तिरंगी लढतीच्या शक्यता भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. धैर्यशील मोहिते- पाटील यांनी सर्वांबरोबर अंतर ठेवत अपक्ष लढले तर प्रवीण गायकवाड ‘तुतारी’ हाती घेतल्यास माढा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT