bank.jpeg 
सोलापूर

जिल्ह्यातील बॅंकामध्ये नव्वद टक्के कर्जदार ग्राहकाकडून कर्ज हफ्ता भरणा सुरु

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः जिल्हाभरात बॅंकांच्या कर्ज वसुलीसाठीच्या मुदतवाढीच्या संमतीला अल्प प्रतिसाद देत नव्वद टक्के कर्जदारांनी त्यांच्या कर्जाचा नियमित हफ्ते भरणा सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे. 

बॅंकाच्या कर्ज वसुलीबाबत पहिल्यांदा तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आलेली होती. दुसर्या टप्प्यात कर्जाची मुदत पुन्हा तीन महिने वाढवल्यानंतर बॅंकांनी कर्जदारांना सुचना मागवून त्यांना पुढील तिन महिन्याची मुदतवाढ हवी किंवा नाही याची विचारणा केलेली होती. कर्जदारांनी प्रतिसादाची नोंद करण्यास सांगितले होते. काही बॅंकांनी ऑनलाइन पध्दतीने मुदतवाढीचे अप्लीकेशन अपलोड करण्याचे सुचवले होते. 

प्रत्यक्षात पहिल्या तिन महिन्यात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने ग्राहक घराबाहेर पडले नाहीत. तेव्हा पहिल्या टप्प्यात सरसगट मुदतवाढ झाली. मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्ज हफ्ता मुदतवाढीसाठी ग्राहकांकडून संमती मागवली होती. ज्यांनी समंती नोंदवली त्यांनाच फक्त मुदत वाढ मिळाली आहे. उर्वरीत बहूतांश ग्राहक नियमित कर्ज हफ्ता भरणा प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. त्यांचा कर्जहफ्ता भरणा नियमीत सुरु झाला आहे. या मुदतवाढीच्या प्रक्रीयेत व्याज सवलत नाही. त्यामुळे या कालावधीत कर्जावरील व्याज सुरूच राहणार आहे. व्याजाचा भुर्दंड बसणारच असेल तर मग हफ्ता भरलेला बरा असे म्हणून कर्जदार हफ्ता भरणा करीत आहेत. ज्यांचे आर्थीक स्त्रोत सुरू आहेत त्यांची कर्ज वसुली बऱ्यापैकी नियमित सुरु झाली. व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय सुरु न झाल्याने मुदतवाढ घेतली. पण ही कर्ज वसुली बॅंकाच्या अर्थकारणासाठी  सकारात्मक मानली जाते.  या कर्ज फेडीसोबत बॅंकाकडून नविन कर्ज वाटप देखील सुरू झाले आहे. 

अर्धवार्षिक कामगिरीकडे लक्ष 
बॅंकींग क्षेत्राचे अर्धे आर्थिक वर्षे हे सप्टेंबर अखेर संपते. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या ताळेबंदामध्ये कोरोना संकटाचे बॅंकावरील परिणाम स्पष्टपणे पाहण्यास मिळणार आहे. याकडे बॅंक क्षेत्रातील जाणकार मंडळी लक्ष ठेवून आहेत. 

सुचनांची प्रतिक्षा 
अर्धवार्षिक ताळेबंदाच्या दृष्टीने येत्या काही दिवसात रिझर्व्ह बॅंकेच्या सुचनांची मोठी प्रतिक्षा नागरी बॅंकाना आहे. या मार्गदर्शक सुचनानुसारच पुढील काळात बॅंकींग क्षेत्राची वाटचाल सुरु राहील. 
- श्रीकांत मोरे, अध्यक्ष मनोरमा मल्टीस्टेट बॅंक सोलापूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT