सोलापूर : टाकळी ते सोरेगाव ही पाईपलाईन वारंवार गळत असल्याने नागरिकांना 100 एमएलडीऐवजी आता 60 एमएलडीच पाणी मिळत आहे. आगामी काळात आणखी परिस्थिती बिकट होणार असल्याने नागरिकांना चार- पाच दिवसांऐवजी आठ दिवसाआड पाणी द्यावे लागेल, अशी भूमिका महेश कोठे यांनी सभागृहात मांडली. मात्र, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची पंचाईत होईल आणि महेश कोठे यांना क्रेडिट जाईल म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्या विषयाला बगल दिल्याचा आरोप कोठे यांनी केला आहे.
सोलापूर- उजनी पाईपलाईनसाठी सुमारे पाचशे कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी 100 कोटी रुपये आता मिळाले असून एनटीपीसीकडून 250 कोटी मिळणार आहेत. तर राज्य सरकारकडून 50 कोटी आणि महापालिकेकडून 50 कोटी रुपये या पाईपलाईनसाठी दिले जाणार आहेत. परंतु, अद्याप काहीच रक्कम प्राप्त झाली नसल्याने ही पाईपलाईन वेळेत पूर्ण होईल की नाही, याबद्दल शंकाच असल्याचेही कोठे म्हणाले. त्यामुळे टाकळी ते सोरेगाव ही जुनी पाईपलाईन बदलण्याची गरज असल्याचे मत सभागृहात व्यक्त केले. त्याला वंचित बहूजन आघाडीचे गटनेते तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांनी समर्थन दिले. मात्र, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी आगामी निवडणुकीत उमेदवार असेल आणि पाणीप्रश्न माझ्या माध्यमातून सुटला तर त्यांना धोका होईल, असे त्यामागे राजकारण असल्याचेही कोठे म्हणाले. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
'अमृत'625 पैकी 68 कोटीच मिळाले
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सत्ताधाऱ्यांनी 2014- 15 मध्ये 625 कोटींचा प्रस्ताव पाठविला. मात्र, त्यातून केवळ 68 कोटी रुपयेच मिळाले आहेत. राज्यातील सत्ता गेल्यानंतर महापालिकेत सत्ता असतानाही तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. दुसरीकडे एक-दोन दिवसाआड पाणी देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडल्याचा आरोप महेश कोठे यांनी केला आहे. वास्तविक पाहता सध्या सुरु असलेली सोलापूर- उजनी पाईपलाइन अमृत योजनेतून झाली असती, तर केंद्र सरकारकडून 50 टक्के तर राज्य सरकारकडून 25 टक्के निधी उपलब्ध झाला असता. स्मार्ट सिटीचा निधी इतर विकासकामांसाठी वापरणे शक्य झाले असते, असेही कोठे म्हणाले. मात्र, माझ्या भूमिकेमुळे शहर उत्तरच्या आमदारांविरुध्द नाराजी वाढेल आणि त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत मला मिळेल, या उद्देशाने सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नावर उत्तर दिले नसल्याचाही आरोप कोठे यांनी 'सकाळ'शी बोलताना केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.