Moulali Chowk 
सोलापूर

कोरोना : सोलापुरातील "या' परिसरात लॉकडाऊनची ऐशीतैशी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : "एऽऽ थांब! कुठं चाललास? तोंडाला मास्क लाव की..!' असा सज्जड पण नागरिकांची काळजी घेणारा इशारा गुरुनानक चौकातील पोलिसांकडून मिळत आहे. या चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची व वाहनचालकांची कसून चौकशी येथे होताना दिसते... पुढे कुर्बान हुसेननगर ते गेंट्याल चौकापर्यंत मुख्य रस्त्यावर किरकोळ गर्दी वगळता सामसूम दिसून येते. मात्र, तेथून शास्त्रीनगर परिसरात गेल्यास संचारबंदीला वेशीवर टांगल्याचे दृश्‍य दिसून आले.

जीवघेण्या संसर्गापासून असुरक्षित परिसर
कुर्बान हुसेननगर येथे किरकोळ भाजी व कांदे विक्रेते ग्राहकांना गर्दी टाळण्याचा व मास्कचा वापर करण्याचा सल्ला देत होते. तर पाण्यासाठी काही नागरिक सायकलीला प्लास्टिकचे हंडे लटकावून जेथे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल तेथून पाणी आणण्यासाठी निघाले होते. झोपडपट्टीच्या आतील अरुंद बोळांमधील घरांच्या कट्ट्यांवर मात्र नागरिकांची दाटीवाटी दिसून येत होती. शास्त्रीनगर झोपडपट्टीपासून भगतसिंग भाजी मार्केटच्या रस्त्यावर सकाळी व सायंकाळची गर्दी पाहता, लॉकडाउनचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून आले. चौकातील अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानांपासून इतर अनावश्‍यक दुकानेही बिनधास्त सुरू होती. श्रीराम मंदिरापासून शानदार चौक, महादेव मंदिर ते मौलाली चौकापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा बट्ट्याबोळ दिसून आला. कोण कुठे व का फिरत आहे, 10-15 मित्रांचा गोतावळा, घरांसमोर, रस्त्यांवर जणू चर्चासत्रेच झडत होती. शहरात बंदी असलेला मावा, गुटखा, तंबाखू आदी वस्तूही येथे उपलब्ध होतात. पोलिस कधी तरी दुचाकीवरून फिरतात तेही मुख्य रस्त्यावरून व नेमलेल्या चौकात विसावतात. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये "कोरोना'ची ना दहशत दिसून आली, ना सामाजिक बांधिलकी.

मौलाली चौकात मात्र बॅरिकेडिंग लावून पोलिस येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी करत होते; मात्र शास्त्रीनगर परिसराचा आतील भाग कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गापासून असुरक्षित आहे, याचाही विचार पोलिस प्रशासनाने करावा, अशी गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे.

रेशन दुकानांसमोर दिसली सोशल डिस्टन्सी
शास्त्रीनगर झोपडपट्टी येथील रेशन दुकान क्र. क 36 चे चालक श्रीनिवास आसादे हे सकाळी आठपासून रात्री नऊपर्यंत रेशन दुकान चालू ठेवत आहेत. गर्दी वाढू नये व सोशल डिस्टन्स राहावे यासाठी सुरक्षित चौकटी आखल्या आहेत. कुणाची तक्रार वा गोंधळ नाही. एकूण 513 कार्डधारक असून, दिवसभरात 150 कार्डधारकांना धान्य वाटप केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र ग्राहकांनी मास्कचा वापर केल्याचे दिसून आले नाही.

पापी पेट का सवाल है!
"साहेब, आमचे 16 जणांचे कुटुंब आहे. चार भाऊ आहोत. लॉकडाउन झाल्यापासून सर्वजण घरातच बसून आहोत. कमाईचे साधन नाही. घरातील सदस्यांचे पोट भरण्यासाठी काहीतरी करावे लागणार ना! त्यामुळे सायंकाळच्या वेळी वडापावची गाडी लावली आहे. गाडीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली आहे. पोलिस येतात तेव्हा सर्व साहित्य घरात नेतो व नंतर पुन्हा विक्री करतो. काय करणार, पापी पेट का सवाल है!' अशी व्यथा शास्त्रीनगर परिसरातील वडापाव विक्रेत्याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

शास्त्रीनगर परिसरातील नागरिक खूप गरीब व कामगार वस्ती आहे. घरात धान्य संपल्याने व आता रेशन दुकानात धान्य उपलब्ध झाल्याने सकाळी आठपासून रेशन दुकानासमोर ओळख पिशव्या ठेवून रांग लावली आहे. लॉकडाउन असल्यामुळे आम्ही घरातच बसून आहोत. आमचा नंबर आला की नाही, हे पाहण्यासाठी येतो. नंबर जवळ आला की, रांगेत उभा राहात आहोत.
- यादगिरी आरकाल,
शास्त्रीनगर

कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून आम्ही रुमाल, स्कार्फ आदींचा वापर करत आहोत. कोरोनापासून सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझर वापरायला हवे, हे मान्य आहे; मात्र यासाठी लागणारे पैसे येथील अशिक्षित, अज्ञान व गरीब कामगारांकडे नसतात. खायचे वांदे आहेत, काम नाही, पगार नाही तेव्हा हा अतिरिक्त खर्च त्यांना पेलवणार नाही.
- अनिता मामड्याल,
शास्त्रीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT