atm.jpg 
सोलापूर

एटीएम सेंटरमध्ये ना सॅनिटायझर, ना थर्मल गन 

अनुराग सुतकर

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. आठवाड्यापासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाउनची चर्चा सुरु झाली आहे. अशात शहर परिसरात असलेल्या एटीएम सेंटरमध्ये कोणत्याच सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले असून, ना सॅनिटायझरची सोय, ना थर्मल गनद्वारे तापमानाची तपासणी. तेथे असलेला सुरक्षा रक्षकही गायब असल्याचे उघड होत आहे. भविष्यात हेच एटीएम सेंटर कोरोनासाठी काळ ठरण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 
सोलापूर शहरात राष्ट्रीयकृत आणि खाजगी बॅंकांचे 120 च्या जवळपास एटीएम केंद्र आहेत. कोरोना काळात या केंद्रात सॅनिटायझर आणि थर्मल गन ठेवल्या होत्या. परंतु कोरोनाचा वेग शिथिल होण्याच्या मार्गावर असल्याने पुन्हा सॅनिटायझर व थर्मल गनसह वॉचमनही गायब झाल्याचे चित्र आहे. बॅंकेपेक्षा एटीएमचा वापर अधिक सोयीचे असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात याच सेंटरमध्ये आहे. असे असतानाही कोरोनाची काळजी घेत नसल्याने भविष्यात यातूनच संसर्ग वाढण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. बॅंकांमधील व्यवहारापेक्षा एटीएममधील व्यवहार सोयीचे असल्याने नागरिकांचा ओढा या सेंटरकडे अधिक आहे. यामुळे दिवसभर नागरिकांची गर्दी एटीएम केंद्र परिसरात असते. ठराविक काळानंतर संपूर्ण एटीएम सेंटर परिसर सॅनिटायझ करण्याबरोबरच पैसे काढल्यानंतर किंवा पैशाची भरणा केल्यानंतर सॅनिटायझरचा वापरणे आवश्‍यक आहे. मात्र तेथे सॅनिटायझरची सोय नसल्याने नागरिकही बिनधास्त वावरत आहेत. कोरोनाचे नियम एटीएममध्ये पाळण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

एटीएम केंद्रात सॅनिटायझर नाही
एकाही एटीएम केंद्रात सॅनिटायझर नाही. यामुळे आपल्यापूर्वी ज्या व्यक्तीने एटीएम मशिनचा वापर केला आहे, तो कोरोनाबाधिताच्या संपर्कात असेल आणि त्याच हाताने त्याने मशीन वापरली असेल तर मग कितीही लॉकडाउन केले तरी कोरोनाचा वेग कमी होणार नाही. 
-सत्यजित वाघमोडे 

सुपर स्प्रेडर ठरु शकतात
कोरोनाचा वेग वाढतोय म्हटल्यावर प्रशासनाने अशा छोट्या-छोट्या बाबी ज्या सुपर स्प्रेडर ठरु शकतात. याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. नाहीतर आपण कितीही प्रयत्न केले तरी कोरोना आपल्याला घेरल्याशिवाय राहणार नाही. 
-सुमित शिंदे 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT