ugavan.png 
सोलापूर

सांगोल्यात बियाणे उगवले नसल्याने कृषी अधिकाऱ्याकडून पाहणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

सांगोला(सोलापूर): सांगोला तालुक्‍यात पुरेसा पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची पेरणी केली. काही ठिकाणी पेरणीनंतर पाऊस होऊनही सूर्यफुलाच्या बियाण्याची उगवण झाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतास प्रत्यक्ष भेट दिली असता पेरणी केलेल्या जमिनीत अत्यंत कमी प्रमाणात सूर्यफुलाची उगवण झाल्याचे दिसले. 

सांगोला तालुक्‍यातील 73 हेक्‍टर क्षेत्रावर सूर्यफुलाची पेरणी झाली असून काही ठिकाणी बियाणे उगवलेच नसल्याच्या तोंडी तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. तक्रारी प्राप्त होताच तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास काळोखे, जवळा मंडल कृषी अधिकारी जांभळे, कृषी पर्यवेक्षक विकास भाले, पारे कृषी सहायक एच. टी. पवार यांनी पारे गावातील हणमंत गायकवाड, बाळासो गायकवाड, सुखदेव गायकवाड, सुरेश भीमराव गायकवाड यांच्या शेताची पाहणी केली.पाहणी दरम्यान काही शेतकऱ्यांच्या जमिनीत सूर्यफुलाची उगवण न झाल्याचे आढळले. पेरणीनंतर पाऊसही झाला. मात्र, जमिनीतून बियाण्याचे कोंब वर आलेच नाही. शेतकऱ्यांनी शेतात दररोज अंकुर येण्याची वाट पाहिली. अखेर त्यांनी बियाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्याकडे केली. 

उगवणीच्या तक्रारीची होईल चौकशी 
बियाणे उगवणबाबत काही अडचण असल्यास तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे शेतकऱ्यांनी बियाणे घेतलेले पक्के बिल व सोबत सातबारा उतारा जोडून रीतसर अर्ज करावा. याबाबत चौकशी केली जाईल. 
- दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT