सुभाष देशमुख, धर्मराज काडादी
सुभाष देशमुख, धर्मराज काडादी esakal
सोलापूर

देशमुख म्हणाले कारखाना हलवा; काडादी म्हणाले बंगला का बांधला?

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

चिमणीच्या विषयात आता आमदार सुभाष देशमुख विरुद्ध कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी असा नवा अध्याय सुरू झाला आहे.

सोलापूर : होटगी रोडवरील विमानसेवेला (Airlines) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Siddheshwar Co-operative Sugar Factories) चिमणीबाबत आतापर्यंत धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) विरुद्घ संजय थोबडे (Sanjay Thobade), डॉ. संदीप आडके (Dr. Sandeep Adke) यांच्यासह इतर काही नावे आहेत. या नावात आता माजी सहकारमंत्री, भाजप (BJP) आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांचाही समावेश झाला आहे. चिमणीच्या विषयात आता आमदार सुभाष देशमुख विरुद्ध कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी असा नवा अध्याय सुरू झाला आहे. (Now BJP MLA Subhash Deshmukh is also involved in the Chimney case of Siddheshwar Sugar Factory)

कारखाना स्थलांतरास मदत करण्याचा दिला होता शब्द : आमदार सुभाष देशमुख

एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख म्हणाले, आमचे (भाजप) राज्यात सरकार असताना चिमणीचा वाद निर्माण झाला. त्या वेळी मी स्वतः काडादी यांना भेटलो. कारखाना सोलापूर (Solapur City) शहराच्या हद्दीत आहे. ती जागा विकली तर भरपूर पैसे मिळतील आणि सभासदांनाही न्याय देता येईल. कारखाना स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे द्या. त्यासाठीचा खर्च मागा. एवढेच नाही तर 15 किलोमीटरच्या हवाई अंतराची अटही रद्द करतो. इतकेच नव्हे तर तुम्ही आमच्या बाजूला कारखाना टाका, असेही सांगितले होते.

आरक्षण रद्द न करता त्या ठिकाणी बगीचाच व्हायला हवा होता : धर्मराज काडादी

आमदार सुभाष देशमुख यांच्याबद्दल आपणास आदर आहे. ते चांगले लोकप्रतिनिधी असतानाही त्यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर बंगला बांधला व आरक्षण (Reservation) रद्द करून घेतले. पर्यावरणाच्या (Environment) दृष्टीने त्यांनी एक नवे गार्डन (Garden) वसविण्याऐवजी आपला बंगला उभारला. हजारो कुटुंबीयांचा आधार असणारा सिद्धेश्वर साखर कारखाना इतरत्र का स्थलांतरित करायचा, असा प्रश्न उपस्थित करीत कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राजकीय कुरघोड्यांतून वाद

साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला की, मुद्दामहून राजकीय कुरघोड्यांतून सिद्धेश्वरच्या चिमणीचा वाद पेटविला जातो. गेल्या पाच गाळप हंगामापासून हा प्रकार सुरू आहे. यामागे कोणाची शक्ती आहे हे माहीत नाही. पण, आम्हाला नाहक त्रास दिला जातो. कारखान्याची बदनामी केली जाते. कारखाना स्थलांतर करण्याचा त्यांचा सल्ला कारखान्याच्या दृष्टीने योग्य नव्हता, असेही काडादी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT