doctor.jpg 
सोलापूर

 अन डॅाक्टर देखील होऊ लागले कोरोना मूक्त 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः शहरातील एकूण पाच डॉक्‍टर कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यापैकी दोन डॉक्‍टर कोरोनामुक्त झाल्याने घरी आले आहेत.

सोलापुरात कोरोना संसर्गाच्या साथीत शहरातील काही डॉक्‍टर आढळले होते. एकूण पाच डॉक्‍टरांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे डॉक्‍टर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. एक डॉक्‍टर व त्यांची आई कोरोना संसर्ग झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडकले होते. त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याची परवानगी मागण्याची कोणतीच सोय नव्हती. तेव्हा त्यांनी फेसबुकवर त्यांचा स्वतःचा व्हिडीओ व्हायरल करून मागणी केली होती. यात ते सिव्हिल येथे त्यांच्या वृद्ध आईची अन्य आजाराच्या त्रासाने स्थिती अधिकच खालावत असल्याचे म्हणाले होते. या व्हिडीओची दखल घेऊन त्यांना पुण्याला उपचारासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा चांगला परिणाम मिळाला आहे. संबंधित डॉक्‍टर व त्यांची आई असे दोघे कोरोनामुक्त होऊन सुखरूप परतले आहेत. 

शहरातील एका प्रसूतीतज्ज्ञास कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर पुण्यात उपचार झाल्यानंतर तेही आजारातून मुक्त झाले आहेत. 
अजूनही तीन डॉक्‍टरांवर उपचार करत असल्याचे समजते. मात्र, लवकरच ते उपचार पूर्ण करून घरी येतील असे सांगितले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर मंडळी सातत्याने कोरोनाबाधित डॉक्‍टरांच्या तब्येतीची विचारपूस करीत आहेत. 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

माहेरी एकुलती एक लेक पण सासरी खटल्याचं घर! अजूनही २ अविवाहित नणंदांसोबत संसार करतायत ऐश्वर्या नारकर

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

Shiv Sena Symbol Case : 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल'; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादावर संजय निरुपम यांचा मोठा दावा, शिंदेंच्या बंडाबाबतही केलं भाष्य

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT