सोलापूर

...आता शिवभोजन थाळी @36000 

विजयकुमार सोनवणे



सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 18000 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले होते. योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहून पहिल्या टप्प्यातील इष्टांकात दुप्पट वाढ करण्याचा राज्यातील ही संख्या 36000निर्णय राज्य शासनाने आज मंगळवारी घेतला. 

ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्‍त करण्यात आली असून, महापालिकेचे आयुक्‍त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव असतील. या संदर्भातील आदेश शासनाने जारी केले. 

प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीन महिन्यांसाठी ही योजना होती. गेल्या दीड महिन्यांत त्यास मिळालेल्या प्रतिसादामुळे योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 10रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या भोजनाते दोन चपात्या, वरण, भाताचा समावेश असेल. सध्या सुस्थितीत सुरू असलेली खानावळ, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, भोजनालय, रेस्टारंट अथवा मेस यापैकी योजना सक्षमपणे राबविणाऱ्या संस्थेची समितीमार्फत निवड केली जाणार आहे. गरीब आणि मजूर वर्गाची वर्दळ असलेल्या ठिकाणी, तसेच जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, बाजारपेठा, शासकीय कार्यालय परिसरात या थाळीची विक्री होईल याची जबाबदारी समितीमार्फत घेतली जाणार आहे. 

ही योजना महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण भागात राबविली जाणार असून, शहरी भागात 50 रुपये तर ग्रामीण भागात 35 रुपये थाळीचा दर असेल. समितीने नियुक्त केलेली संस्था ग्राहकांकडून फक्त 10 रुपये घेईल. उर्वरीत रक्कम त्यांना अनुदानाच्या स्वरूपात दिली जाणार आहे. हे भोजनालय दुपारी 12 ते 02 या कालावधीत सुरू असेल. शासकीय कार्यालय परिसरात असलेल्या भोजनालयात सवलतीचे भोजन घेण्यास शासकीय कर्मचाऱ्यांना बंदी असणार आहे. 



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना अखेर दिलासा! आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार आराम

Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Monsoon Update India : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय ! केरळमध्ये पुढील दोन दिवसांत होणार दाखल, महाराष्ट्र आगमन कधी ? अपडेट समोर

माधुरी नको म्हणत असतानाही दिग्दर्शकानं बळजबरीनं शूट केलं गाणं, रिलीज होताच ठरलं सुपरहिट

IPL 2026 Playoff Race: मुंबई विरुद्ध राजस्थान: प्लेऑफची चौथी जागा कोणाची? पाहा सविस्तर समीकरणे!

SCROLL FOR NEXT