Now song on the Corona Virus 
सोलापूर

झालं आता कोरोना वायरसचंही गाणं...

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कोरोना वायरस आलाय चायनामधुन... धुमाकुळ घातलाय भारतात कोरोना वायरसन... हे गीत सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. लग्नाच्या वरातीत देखील या गाण्याचा बोलबाला आहे. चीनमधुन जगभरात थैमान घातलेल्या या कोरोना वायरसबाबत एकिकडे सरकारकडून खबरदारीसाठी वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात करून नागरिकांना जागृत करत असताना. मात्र सोशल मिडीयात हा वायरस ट्रेंड बनला असुन धुमाकूळ घालत आहे.
कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव व अतिजलद प्रसार यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीन पाठोपाठ भारतात देखील कोरोना वायरसने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने खबरदारीसाठी जाहीरात केली जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे अफलातून शक्कल लढवत मोबाइलच्या डायलरटोनला याबाबत जाहीरात सुरू केली असल्याने प्रत्येकाच्या मोबाईलवर  काॅलरट्युन व रिंगऐवजी चक्क प्रथम खोकत असल्याचा आवाज व कोरोनासंदर्भात उपयुक्त माहिती देण्यास सुरुवात केली जात आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी फोन लागला असल्याचे समजुन नागरिक फोन कट करताना दिसत आहेत.
नागरिकांनी देखील या वायरसचा धसका घेतला आहे. परंतु भारतात काहीही नवीन घटना घडली अथवा इतर देशात जरी घडली तरी सोशल मिडीयावर मात्र त्याबाबत ट्रेंड सुरू होतो अन् तसाच या वायरसबद्दल ट्रेंड तयार झाला असुन, सोशल मिडीयावर यावर तयार झालेलं गीत सध्या धुमाकूळ घालत आहे. तरी दुसरीकडे चायनातुन आलेल्या वस्तु भारतात टिकत नाहीत तर हा वायरस काय टिकणार...  अशा प्रकारचे वेगवेगळे जोक्स देखील पहायला मिळत आहेत. परंतु शासनाच्या वतीने प्रथमच या वायरस बद्दल डायलरटोनवरती जाहीरात सुरू केल्याने नागरिकांमध्ये मात्र अधिक घबराट निर्माण झालेली पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT