02Child_Mask_0.jpg 
सोलापूर

'ग्रामीण'ची रुग्णसंख्या कमी होईना ! आज 102 पॉझिटिव्ह; तीन तालुक्‍यात आढळला नाही एकही रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून दररोज शंभराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यात पंढरपूर, माळशिरस, बार्शी, सांगोला या तालुक्‍यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. आज दोन हजार 245 संशयितांमध्ये 102 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर मोहोळ व पिलिवमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापुरात एकही रुग्ण आढळलेला नाही.

ठळक बाबी...

  • आतापर्यंत ग्रामीण भागातील तीन लाख 40 हजार 486 संशयितांची कोरोना टेस्ट
  • ग्रामीण भागात आतापर्यंत आढळले 36 हजार 262 रुग्ण; एक हजार 55 जणांचा मृत्यू
  • आज उत्तर व दक्षिण सोलापूर व अक्‍कलकोटमध्ये आढळला नाही एकही रुग्ण
  • ग्रामीणमध्ये उरले आता एक हजार 541 रुग्ण; आज 133 रुग्ण झाले बरे
  • रुग्णांच्या संपर्कातील 11 हजार 946 संशयित होम क्‍वारंटाईन तर 2846 इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन

ग्रामीण भागात आज बार्शी तालुक्‍यात 13, करमाळ्यात सात, माढ्यात पाच, माळशिरसमध्ये 39, मंगळवेढा व मोहोळ तालुक्‍यात प्रत्येकी चार, पंढरपूर तालुक्‍यात 15 तर सांगोल्यातही 15 रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक सहा हजार 711 रुग्ण आढळले आहेत. तर मृतांमध्ये बार्शी तालुका अव्वल असून आतापर्यंत 185 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीण भागातील एकूण रुग्णांपैकी 33 हजार 667 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 'माझे गाव कोरोनामुक्‍त गाव' या अभियानातून कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड; वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव, शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार का?

पुन्हा एकदा साडे माडे तीनच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली ! 'या' तारखेला होणार रिलीज

Latest Marathi News Live Update : वाघोलीत शाळा परिसरात वारंवार मुलांच्या हाणामारीचे प्रकार

Bigg Boss Marathi 6 Video : "आता बास झालं" डॉन प्रभूला रितेशचा सज्जड दम ; प्रोमो चर्चेत

Students Poisoned During Trip : अक्कलकोटहून कोल्हापुरात सहलीसाठी आलेल्या मुलींना विषबाधा, ६ ते ७ जणांना बाधा

SCROLL FOR NEXT