The global environment
The global environment 
सोलापूर

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त निश्‍चय करूया कृतिशीलतेतून जपूया जैवविविधता 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : युनाइटेड नेशन इन्व्हॉर्नमेंट या जागतिक संस्थेच्या वतीने दरवर्षी एका देशाला पर्यावरण दिनाचं यजमानपद आणि एक विशिष्ट घोषवाक्‍य दिलं जातं. मागच्या वर्षी 2019 मध्ये या दिनाचं यजमानपद चीनकडे होतं आणि यावर्षाची अतिशय महत्त्वाची थीम होती "बीट एअर पोल्यूशन' ! (वायू प्रदूषण संपवूया). प्रदूषित वायूमुळे दरवर्षी संपूर्ण जगात जवळपास 70 लाखांची अकाली जीवित हानी होतेय. यापैकी 40 लाख जीवित हानी ही आशिया खंडात झाल्याचे सर्वेक्षणात दिसले आहे. याबरोबरच सध्या वायू प्रदूषणाचा त्रास अनेकांना होत असल्याची कल्पना सर्वांना आहे. मानवाच्या बदलत गेलेल्या जीवनशैलीने, जिथे जिथे माणूस पोचला तेथे त्याने आपल्या पाऊलखुणा उमटविल्या, त्यालाच संबंध जगभरात "कार्बन फूटप्रिंट' असं संबोधलं जातं. मानवाकडून केलं जाणारं कार्बन उत्सर्जन म्हणजे कार्बन फूटप्रिंट होय. उत्सर्जित किंवा बाहेर टाकलेल्या वायूंत कार्बन डायऑक्‍सिइडबरोबरच अनेक घातक वायूंचा समावेश असतो. कुठल्याही एका व्यक्तीच्या माध्यमातून पर्यावरणावर होणार विपरीत परिणाम मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी "कार्बन फूटप्रिंट'ची संकल्पना मांडली. आपल्या देशात औद्योगिक क्रांती होण्याअगोदर मानवाद्वारे तयार होणारा कार्बन डायऑक्‍साइड आजूबाजूला असलेल्या जंगलातली मुबलक झाडे शोषून घेत असत. लहान-मोठी झाडे, घराभोवती असलेली छोटी-छोटी रोपे कार्बन डायऑक्‍साइड शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्‍सिजन देतात. औद्योगिकरणानंतर हा वायू खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जंगले कमी होऊ लागली. झाडांची संख्या कमी होऊ लागली. या प्रकाराने मोठ्या प्रमाणात उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्‍साइड हवेत मिसळत राहिला, परिणामी वातावरणातले तापमान वाढायला लागले आणि त्यासोबत वातावरण प्रदूषित होण्यास सुरवात झाली. 

2020 या वर्षाच्या पर्यावरण दिनाची थीम आहे "जैवविविधतेचे महत्त्व' ! यावेळचे यजमानपद हे संयुक्तपणे कोलंबिया आणि जर्मनी देशाकडे आहे. कोलंबिया हा देश पक्षी आणि फूलझाडांच्या विविध प्रजातींसाठी प्रथम स्थानावर आणि वनस्पती, फुलपाखरे आणि गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजातीसाठी दुसऱ्या स्थानावर आहे. 

जैवविविधता ही व्यापक संकल्पना आहे. पृथ्वीवरील सजीवांत आढळणारी विविधता म्हणजे जैवविविधता होय. आपल्या परिसरात आढळणारे दुर्मिळ पक्षी व त्यांचे जीवन, अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती, झाडी-झुडूपी, प्राणी, किटके, फुलपाखरे यांचा सविस्तर अभ्यास करून या जैविक संपत्तीचे संवर्धन करणे अत्यावश्‍यक आहे. जैवविविधता म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग, प्राणी, पशु-पक्षी, कीटक आणि असंख्य असे सूक्ष्म जीव आहेत. त्यांचं जीवन, अधिवास आहे तसा ठेवणे म्हणजेच जैवविविधतेचे संवर्धन करणे होय. याठिकाणचा प्रत्येक जीव आनंदाने जगला पाहिजे हीच भूमिका आहे. मानवी जीवनात जैवविविधतेला खूप महत्त्व आहे. कारण, माणूस हा मुळात पर्यावरणाचा अविभाज्य असा घटक आहे. मनुष्यप्राण्याच्या शाश्‍वत आणि चिरंतर अस्तित्वासाठी पृथ्वीतलावरची जैवविविधता अबाधित राहणं अत्यंत आवश्‍यक आहे. 

विविध प्रकारची देशी झाडी लावणं आणि ती सांभाळणं, प्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवणं, त्यांच्या अन्नधान्याची सोय करणं, या मुक्‍या जीवांवर जीवापाड प्रेम करत राहणं आणि त्यांच्याशी असलेलं नातं आणखी दृढ करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहणं या गोष्टी जैवविविधता संवर्धनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 

कृतिशीलतेतून अबाधित ठेवण्याचा दृढ संकल्प करण्याची ही वेळ आहे 
वास्तविक पाहता या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक सजीवाला जगण्याचा तितकाच हक्क आहे जितका मानव नावाच्या प्राण्याला ! आपल्या देशातील, आपल्या परिसरातील जैवविविधता कृतिशीलतेतून अबाधित ठेवण्याचा दृढ संकल्प करण्याची ही वेळ आहे. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण सारेजण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि जैवविविधतेचे महत्त्व समजून घेऊन ही जैवविविधता कायमच जपत राहूया .. ! 
- निसर्गमित्र अरविंद म्हेत्रे 

मागील 10 वर्षांतील पर्यावरण दिनाचे विषय आणि यजमानपद स्वीकारलेले देश 

  • 2010 - मेनी स्पेसीज - वन प्लॅनेट - वन फ्युचर - आफ्रिका 
  •  2011 - जंगले - निसर्ग तुमच्या सेवेत - भारत 
  •  2012 - ग्रीन इकॉनॉमी ः डज इट इन्क्‍लूड यू - ब्राझील- 
  •  2013 - थिंक इट फूड- मंगोलिया 
  • 2014 - इंटरनॅशनल इअर ऑफ स्मॉल आइसलॅंड डेव्हलपिंग स्टेटस (एसआयडीएस) बार्बाडोस - वेस्ट इंडिज 
  •  2015 - सेव्हन बिलियन ड्रीम्स - वन प्लॅनेट, कन्झ्युम वीथ केअर - इटली 
  •  2016 - गो वाइल्ड फॉर लाइफ अंगोला - पोर्तुगीज 
  •  2017 - कनेक्‍टिंग पीपल टू नेचर, इन द सिटी ऍण्ड ऑन द लॅंड फ्रॉम द पोल्स टू द इक्‍वेटर - कॅनडा 
  • 2018 - बीट प्लास्टिक पोल्यूशन - भारत 
  •  2019 - एअर पोल्यूशन - चीन- 
  • 2020 - बायोडायव्हरसिटी इमॉरटन्स - कोलंबिया आणि जर्मनी 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT