Corona Media Gallery
सोलापूर

सोमवारी एकाच दिवशी 2010 जण कोरोनामुक्त ! 56 रुग्णांचा मृत्यू: 1332 नवीन बाधित

सोमवारी एकाच दिवशी 2010 जण कोरोना आजारातून मुक्त झाले

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील 2010 जण आज कोरोनामुक्त (Covid-19) झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1747 तर महापालिका हद्दीतील 263 जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे 56 जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून (Corona Report) समोर आले आहे. त्यातील 47 जण हे ग्रामीण भागातील तर 9 जण हे महापालिका हद्दीतील आहेत. (On Monday, the same day, 2010 people were released from Corona disease)

आज 1332 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. त्यातील 1160 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 172 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयातील ×क्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. सध्या रुग्णालयात 18 हजार 62 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये 16 हजार 590 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 1472 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्‍यात आठ जणांचा मृत्यू आज ग्रामीण भागातील 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये एकट्या उत्तर सोलापूर तालुक्‍यातील आठ, पंढरपूर तालुक्‍यातील 7, मोहोळ व अक्कलकोट तालुक्‍यातील प्रत्येकी सहा, बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्‍यातील प्रत्येकी पाच, मंगळवेढा तालुक्‍यात चार, सांगोला तालुक्‍यातील 1 अशा एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूरमध्ये सर्वाधिक बाधित

आज ग्रामीण भागात 1160 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 328 रुग्ण आढळले आहेत. अक्कलकोट तालुक्‍यात 50, बार्शी तालुक्‍यात 116, करमाळा तालुक्‍यात 135, माढा तालुक्‍यात 57, माळशिरस तालुक्‍यात 230, मंगळवेढा तालुक्‍यात 53, मोहोळ तालुक्‍यात 52, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 24, सांगोला तालुक्‍यात 62 व दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 53 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : थरार... दक्षिण आफ्रिकेने दोनवेळा पराभव टाळला ! डबल Super over मध्ये अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला

Tutankhamun’s Tomb : थडग्यात सापडली 3,300 वर्षे जुनी सँडल; शत्रूंना पायाखाली तुडवायचा राजा, सँडल्सवर का कोरली होती शत्रूंची चित्रे?

Post Office Jobs 2026: ग्रामीण डाक सेवक पदांची भरती अंतिम टप्प्यात; या उमेदवारांना संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना उमेदवाराने गमावला जीव

"त्यांना मी रजनीकांतप्रमाणे धुणार" करण जोहर आणि विकीवर भडकला गोविंदा ; हे आहे कारण !

SCROLL FOR NEXT